E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
पुणे वॉरियर्सचा सलग दुसरा विजय
Vikrant kulkarni
09 Jun 2025
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग(डब्लूएमपीएल) २०२५ स्पर्धेत तिसर्या दिवशी तिसर्या लढतीत जलद गती गोलंदाज २० वर्षीय चिन्मयी बोरफळे(४-१९) हिने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पुणे वॉरियर्स संघाने रायगड रॉयल्स संघाचा ८ गडी राखून पराभव करत सलग दुसर्या विजयाची नोंद केली. गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत पुणे वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व तो त्यांच्या गोलंदाजांनी अचूक ठरविला.
आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या रायगड रॉयल्सची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. कर्णधार किरण नवगिरेला पुणे वॉरियर्सच्या चिन्मयी बोरफळेने पहिल्याच चेंडूवर झेल बाद केले. पाठोपाठ भाविका अहिरे(८) देखील बाद झाली. तर चिन्मयी बोरफळेने ऋतुजा गिलबिले(०)ला त्रिफळा बाद करून आपला वैयत्तिक तिसरा बळी घेत रायगड रॉयल्स संघाला ४.२ षटकात ३ बाद ३९ असे अडचणीत टाकले.त्यानंतर आदिती गायकवाड १३ धावा काढून बाद झाली. ५ बाद २४ धावा अशी एकवेळ खराब स्थिती झालेली असताना आयेशा शेखने २४ धावा काढून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण चिन्मयी बोरफळेने आयेशा शेखला झेल बाद करून स्पर्धेतील आतापर्यंत सर्वाधिक बळी घेण्याचा मान मिळवला.तळातील फलंदाज यशोदा घोगरे(नाबाद १६) व रोशनी पारधी(नाबाद १४) यांनी आठव्या विकेटसाठी १० चेंडूत २३ धावांची भागीदारी करून रायगड रॉयल्सला १०२ धावांपर्यंत मजल गाठून दिली.
पुणे वॅरियर्सकडून चिन्मयी बोरफळेने १९ धावात ४ गडी महत्वपूर्ण टिपले. समृद्धी डाळेने १९ धावात २ गडी तर, इशिता खळेने १३ धावात १ गडी बाद केला. १०२ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या पुणे वॉरियर्स संघाने हे आव्हान १४.५ षटकात २बाद १०३धावा करून पूर्ण केले.
अक्षया जाधवने ३७ चेंडूत ५चौकाराच्या मदतीने नाबाद ३६ धावांची संयमी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. अक्षया व खुशी मुल्ला(२९धावा) यांनी दुसर्या विकेटसाठी ३२चेंडूत ३१ धावांची भागीदारी केली. पण प्रज्ञा वीरकरने ख़ुशी मुल्लाला त्रिफळा बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर अक्षयाने श्वेता माने(नाबाद २३धावा)च्या साथीत चौथ्या विकेटसाठी ३३ चेंडूत ४२ धावांची भागीदारी करून संघाचा विजय सुकर केला.
संक्षिप्त धावफलक
रायगड रॉयल्स: २०षटकात ८बाद १०२धावा(आयेशा शेख २४, यशोदा घोगरे नाबाद १६, रोशनी पारधी नाबाद १४, आदिती गायकवाड १३, इशा पाठारे ११, चिन्मयी बोरफळे ४-१९, समृद्धी डाळे २-२९, इशिता खळे १-१३) पराभूत वि. पुणे वॉरियर्स: १४.५ षटकात २बाद १०३धावा(अक्षया जाधव नाबाद ३६(३७,५ु४), ख़ुशी मुल्ला २९(२३,५ु४),
Related
Articles
रवींद्रनाथ टागोर यांच्या बांगलादेशातील घरावर जमावाचा हल्ला
12 Jun 2025
उद्धव-राज युतीबाबत आम्ही शेवटपर्यंत आशावादी : संजय राऊत
15 Jun 2025
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख
16 Jun 2025
तेहरानवर मोठा हवाई हल्ला होणार
17 Jun 2025
पुरी प्रशासनासोबत काम करणार आयआयटी, आयआयएमचे विद्यार्थी
12 Jun 2025
कोथरूडमधील वेदभवन पुलावर भीषण अपघात
17 Jun 2025
रवींद्रनाथ टागोर यांच्या बांगलादेशातील घरावर जमावाचा हल्ला
12 Jun 2025
उद्धव-राज युतीबाबत आम्ही शेवटपर्यंत आशावादी : संजय राऊत
15 Jun 2025
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख
16 Jun 2025
तेहरानवर मोठा हवाई हल्ला होणार
17 Jun 2025
पुरी प्रशासनासोबत काम करणार आयआयटी, आयआयएमचे विद्यार्थी
12 Jun 2025
कोथरूडमधील वेदभवन पुलावर भीषण अपघात
17 Jun 2025
रवींद्रनाथ टागोर यांच्या बांगलादेशातील घरावर जमावाचा हल्ला
12 Jun 2025
उद्धव-राज युतीबाबत आम्ही शेवटपर्यंत आशावादी : संजय राऊत
15 Jun 2025
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख
16 Jun 2025
तेहरानवर मोठा हवाई हल्ला होणार
17 Jun 2025
पुरी प्रशासनासोबत काम करणार आयआयटी, आयआयएमचे विद्यार्थी
12 Jun 2025
कोथरूडमधील वेदभवन पुलावर भीषण अपघात
17 Jun 2025
रवींद्रनाथ टागोर यांच्या बांगलादेशातील घरावर जमावाचा हल्ला
12 Jun 2025
उद्धव-राज युतीबाबत आम्ही शेवटपर्यंत आशावादी : संजय राऊत
15 Jun 2025
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख
16 Jun 2025
तेहरानवर मोठा हवाई हल्ला होणार
17 Jun 2025
पुरी प्रशासनासोबत काम करणार आयआयटी, आयआयएमचे विद्यार्थी
12 Jun 2025
कोथरूडमधील वेदभवन पुलावर भीषण अपघात
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !