E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
मस्क रशियात राजकीय आश्रय घेऊ शकतात
Wrutuja pandharpure
08 Jun 2025
खासदार दिमित्री नोविकोव्ह यांनी दिला प्रस्ताव
मॉस्को
: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क यांच्यातील तणाव वाढला असतानाच रशियाने त्यात उडी घेतली आहे. रशियातील खासदार दिमित्री नोविकोव्ह यांनी मस्क हे रशियात राजकीय आश्रय घेऊ शकतात असे सूचक विधान केले आहे. मस्क यांना हा प्रस्ताव देत दोघांमधील वादाचा फायदा उचलण्याची संधी रशियाने साधली आहे.
कम्युनिस्ट पार्टी ऑफ द रशियन फेडरेशनचे उपाध्यक्ष नोविकोव्ह म्हणाले,मस्क यांची धोरणे वेगळी आहेत, त्यांना कोणत्याही राजकीय आश्रयाची आवश्यकता नाही. मात्र, त्यांना गरज पडली तर रशिया त्यांना निश्चितच आश्रय देऊ शकतो. ट्रम्प आणि मस्क यांच्यातील वाद ही अमेरिकेची अंतर्गत बाब आहे आणि आम्ही त्यात हस्तक्षेप करणार नाही. मात्र, ट्रम्प स्वत:हून ही परिस्थिती हाताळतील, असाही आम्हाला विश्वास आहे.
ट्रम्प यांचे माजी सल्लागार स्टीव्ह बॅनन यांनी मस्क यांना अवैध स्थलांतरित म्हटले आहे. तसेच त्यांच्या हकालपट्टी करून स्पेसएक्स जप्त करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर मस्क यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अंतराळवीर आणि इतर वस्तू वाहून नेण्यासाठी वापरल्या जाणार्या स्पेस कॅप्सूलच्या सेवा बंद करण्याची धमकी ट्रम्प यांना दिली होती. त्यानंतर दोघांमधील वाद शिगेला पोहोचला असून, त्यांच्यात राजकीय संघर्ष सुरू झाला आहे.
जागतिक राजकारणात अमेरिका आणि रशिया हे दोन महासत्ता देश नेहमीच एकमेकांच्या विरोधात राहिले आहेत. एकमेकांना कमी लेखण्याची किंवा ताकद दाखविण्याची संधी दोन्ही देश सोडत नाहीत. रशियाने यापूर्वी अमेरिकेचे व्हिसलब्लोअर एडवर्ड स्नोडेन आणि क्रेमलिन समर्थक ब्रिटिश ब्लॉगर ग्राहम फिलिप्स यांना राजकीय आश्रय दिला आहे.
Related
Articles
प्रशांत सोलंकीने जिंकली क्रिकेटप्रेमींची मने
17 Jun 2025
पाकिस्तानात ‘ब्रिगेड ३१३’ कशी?
12 Jun 2025
भारत लवकरच तिसरी आर्थिक महासत्ता
16 Jun 2025
प्रकृती खालावल्यामुळे सोनिया गांधी रुग्णालयात दाखल
16 Jun 2025
सुरुची सिंगला सुवर्णपदक
14 Jun 2025
प्रणव घोलकर,नशा रेवसकर यांची विजेतेपदावर मोहोर
13 Jun 2025
प्रशांत सोलंकीने जिंकली क्रिकेटप्रेमींची मने
17 Jun 2025
पाकिस्तानात ‘ब्रिगेड ३१३’ कशी?
12 Jun 2025
भारत लवकरच तिसरी आर्थिक महासत्ता
16 Jun 2025
प्रकृती खालावल्यामुळे सोनिया गांधी रुग्णालयात दाखल
16 Jun 2025
सुरुची सिंगला सुवर्णपदक
14 Jun 2025
प्रणव घोलकर,नशा रेवसकर यांची विजेतेपदावर मोहोर
13 Jun 2025
प्रशांत सोलंकीने जिंकली क्रिकेटप्रेमींची मने
17 Jun 2025
पाकिस्तानात ‘ब्रिगेड ३१३’ कशी?
12 Jun 2025
भारत लवकरच तिसरी आर्थिक महासत्ता
16 Jun 2025
प्रकृती खालावल्यामुळे सोनिया गांधी रुग्णालयात दाखल
16 Jun 2025
सुरुची सिंगला सुवर्णपदक
14 Jun 2025
प्रणव घोलकर,नशा रेवसकर यांची विजेतेपदावर मोहोर
13 Jun 2025
प्रशांत सोलंकीने जिंकली क्रिकेटप्रेमींची मने
17 Jun 2025
पाकिस्तानात ‘ब्रिगेड ३१३’ कशी?
12 Jun 2025
भारत लवकरच तिसरी आर्थिक महासत्ता
16 Jun 2025
प्रकृती खालावल्यामुळे सोनिया गांधी रुग्णालयात दाखल
16 Jun 2025
सुरुची सिंगला सुवर्णपदक
14 Jun 2025
प्रणव घोलकर,नशा रेवसकर यांची विजेतेपदावर मोहोर
13 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !