काँग्रेसचे आज आंदोलन   

मुंबई, (प्रतिनिधी) : धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली भाजप महायुती सरकार मुंबईतील विविध ठिकाणच्या मोक्याच्या  जागा अदानीला भेट देत सुटले आहे. मिठागरे, देवानर डंपिंग ग्राऊंडची जमीन दिल्यानंतर  आता कुर्ल्यातील मदर डेअरीची साडेआठ हेक्टर जमीनही देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाच्या  विरोधात मुंबई काँग्रेसच्या वतीने आज (रविवारी ) जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे.
 
कुर्ल्यातील मदर डेअरीच्या जागेवर बोटॅनिकल गार्डन करावे,  ही स्थानिकांची मागणी आहे. या जागेत हजारो वृक्ष आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली ही जागा अदानीच्या घशात घालण्यापासून वाचवण्यासाठी अनेक आंदोलने केली. पण, राज्य सरकार मात्र जनतेकडे दुर्लक्ष करून अदानीसाठी काम करत आहे.त्यामुळे सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि खासदार  वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात आज आंदोलन केले जाणार आहे. या  आंदोलनात काँग्रेसचे वरिष्ठ नेते, सर्व आजी माजी खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. 

Related Articles