E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
घराच्या बाल्कनीत खेळताना दुसर्या मजल्यावरून पडूनही चिमुकली बचावली!
Wrutuja pandharpure
13 Jun 2025
पिंपरी
: मोशी परिसरात तीन वर्षांची चिमुरडी खेळताना दुसर्या मजल्यावरील घराच्या बाल्कनीतून खाली पडली. बेशुद्धावस्थेत असलेल्या या मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. डॉक्टरांनी वेळीच उपचार केल्याने तिचा जीव वाचविण्यात यश आले.पुण्यातील मोशी परिसरात राहणार्या कुटुंबातील ही मुलगी आहे. ती खेळताना दुसर्या मजल्यावर असलेल्या घराच्या बाल्कनीतून खाली पडली. शेजार्यांना ती बेशुद्धावस्थेत आढळली. मेंदूला झालेल्या दुखापतीमुळे तिची प्रकृती गंभीर झाली होती. पालकांनी तिला तातडीने अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रन येथे नेले. तिला बाल अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. तिला २४ तासांसाठी निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. तिच्या सीटी स्कॅन तपासणीमध्ये कवटीच्या हाडाचे फ्रॅक्चर आढळले.
मुलीच्या मेंदूवर दबाव येऊन प्रकृती खालावल्यामुळे मेंदूवरील दबाव कमी करण्यासाठी व रक्ताची गाठ काढण्यासाठी तिच्यावर तातडीने आपत्कालीन शस्त्रक्रिया करण्यात आली. वेळेत झालेले उपचार आणि शस्त्रक्रियेमुळे तिला नवीन आयुष्य मिळाले. बालरोगतज्ज्ञ डॉ. मिलिंद जंबगी, बालरोग चेताविकारतज्ज्ञ डॉ. शिजी चालीपट आणि न्यूरोसर्जन डॉ. अभिजित घंगाळे यांच्या पथकाने तिच्यावर यशस्वी उपचार केले.
याबाबत डॉ. मिलिंद जंबगी म्हणाले की, उंचावरून खाली पडल्याने लहान मुलांच्या मेंदूला दुखापत होऊ शकते.ती नंतर गंभीर रूप धारण करू शकते. या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी ती कोमात होती. तिची प्रकृती बिघडू लागल्याने ताबडतोब तिच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता ही मुलगी बरी होत असून पुन्हा सामान्यपणे आयुष्य जगण्यासाठी तयार आहे.
Related
Articles
नामुष्की ओढवून घेतलेला पंतप्रधान!
15 Jun 2025
अहिल्यानगरमध्ये वादळी वार्यासह जोरदार पाऊस
12 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत ७० तोळे सोन्याचे दागिने, ८० हजारांची रोकड सापडली
17 Jun 2025
जोरदार पावसामुळे पुण्यात रस्त्यांना नद्यांचे स्वरूप
14 Jun 2025
''विमान कोसळले आणि मी सीटसह फेकला गेलो”
13 Jun 2025
सिफ्ट कौर समराने जिंकले सुवर्णपदक
13 Jun 2025
नामुष्की ओढवून घेतलेला पंतप्रधान!
15 Jun 2025
अहिल्यानगरमध्ये वादळी वार्यासह जोरदार पाऊस
12 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत ७० तोळे सोन्याचे दागिने, ८० हजारांची रोकड सापडली
17 Jun 2025
जोरदार पावसामुळे पुण्यात रस्त्यांना नद्यांचे स्वरूप
14 Jun 2025
''विमान कोसळले आणि मी सीटसह फेकला गेलो”
13 Jun 2025
सिफ्ट कौर समराने जिंकले सुवर्णपदक
13 Jun 2025
नामुष्की ओढवून घेतलेला पंतप्रधान!
15 Jun 2025
अहिल्यानगरमध्ये वादळी वार्यासह जोरदार पाऊस
12 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत ७० तोळे सोन्याचे दागिने, ८० हजारांची रोकड सापडली
17 Jun 2025
जोरदार पावसामुळे पुण्यात रस्त्यांना नद्यांचे स्वरूप
14 Jun 2025
''विमान कोसळले आणि मी सीटसह फेकला गेलो”
13 Jun 2025
सिफ्ट कौर समराने जिंकले सुवर्णपदक
13 Jun 2025
नामुष्की ओढवून घेतलेला पंतप्रधान!
15 Jun 2025
अहिल्यानगरमध्ये वादळी वार्यासह जोरदार पाऊस
12 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत ७० तोळे सोन्याचे दागिने, ८० हजारांची रोकड सापडली
17 Jun 2025
जोरदार पावसामुळे पुण्यात रस्त्यांना नद्यांचे स्वरूप
14 Jun 2025
''विमान कोसळले आणि मी सीटसह फेकला गेलो”
13 Jun 2025
सिफ्ट कौर समराने जिंकले सुवर्णपदक
13 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक