बालगंधर्वसह यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पेस्ट कंट्रोल   

स्वच्छेतसह पिंजरेही बसविले 

पुणे : नाट्यगृहातील उंदरांचा वावर कमी करण्यासाठी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पिंजरे बसविण्यात आले आहेत. बालगंधर्व रंगमंदिर आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात महापालिका प्रशासनाकडून पेस्ट कंट्रोल करण्यात आले. उर्वरित नाट्यगृहात पेस्ट कंट्रोलचे काम सुरू असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगितले. 
 
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात काही दिवसांपूर्वी नाटकाचा प्रयोग सुरू असताना एका प्रेक्षकाच्या अंगावर उंदीर चढला होता. तसेच काही प्रेक्षकांच्या पायाला उंदराने चावा घेतला होता. या घटनेनंतर महापालिका प्रशासनाने तातडीने बैठक बोलावून उपाय योजना करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार नाट्यगृहाची स्वच्छता आणि पेस्ट कंट्रोलचे काम सुरू झाले आहे. बालगंधर्व रंगमंदिर आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची आज स्वच्छता व पेस्ट कंट्रोलचे काम पूर्ण झाले. 
 
नाट्यगृहातील पिण्याच्या पाण्याचे कुलर, कुलरची जागा तसेच तो परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. तसेच नाट्यगृहातील अडगळीच्या जागेची स्वच्छता करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून वापरात नसलेले जे साहित्य पडले आहे. ते साहित्य उचलण्यात आले आहे. तसेच साहित्य उचललेल्या जागेची स्वच्छता करण्यात आली आहे. ज्या भागातून उंदीर नाट्यगृहात प्रवेश करत आहेत. त्या ठिकाणी पिंजरे लावल्याले महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

प्रयोगाआधी प्रेक्षकांना विशेष सुचना 

नाट्यगृहात प्रयोग सुरू होण्याआधी आयोजकांकडून विशेष सूचना दिल्या जात आहेत. त्यात नाट्यगृहात खाद्यपेय न नेऊ नये. नाट्यगृहातील स्वच्छता राखण्यासाठी प्रयोग सुरू असताना आयोजक आणि प्रेक्षकांना कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाकडून येत्या आठवडाभरात एका खासगी एजन्सीची नेमणूक करणार आहे. त्या संदर्भात काही एजन्सीशी प्राथमिक स्वरूपात बोलणी सुरू आहे. लवकरच नाट्यगृहाची जबाबदारी एजन्सीकडे दिली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

Related Articles