E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
बकरी ईदमुळे वाहतूक व्यवस्थेत बदल
Wrutuja pandharpure
07 Jun 2025
पुणे
: बकरी ईदचा सजण आज साजरा होत असून, या दिवशी मुस्लिम धर्मीय आपापल्या मोहल्ल्यातील मशिदी व ईदगाह मैदानावर एकत्र येऊन सामूहिक नमाज पठण करतात. गोळीबार चौकाजवळील ईदगाह मैदान परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची आणि वाहनांची गर्दी होते. त्या पार्श्वभूमीवर गोळीबार मैदान चौक आणि इतर ईदगाह मैदानाच्या परिसरातील वाहतूकीत बदल करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे (मुख्यालय/अतिरिक्त कार्यभार वाहतूक) यांनी काढले.
आज सकाळी सहा वाजल्यापासून नमाज पठण पूर्ण होईपर्यंत मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान चौक, गोळीबार मैदान चौक ते ढोले पाटील (सेव्हन लव्हज) चौक व सीडीएओ चौक ते गोळीबार मैदान चौक या मार्गांवरील सर्व प्रकारची वाहतूक वळविण्यात येणार आहे. मात्र अग्निशमन दलातील वाहने, पोलीस वाहने, रुग्णवाहिका यांसारखी अत्यावश्यक सेवेतील वाहने यामधून वगळण्यात आली आहेत.
भैरोबानाला ते गोळीबार मैदान चौकाकडे जाणारी वाहतूक भैरोबानाला येथे आवश्यकतेनुसार सकाळी सहा ते साडेअकरा वाजेपर्यंत बंद राहील. स्वारगेटकडे जाणारी जड वाहने (फक्त मार्केट यार्डसाठी) प्रिन्स ऑफ वेल्स रस्त्याने लुल्लानगर चौक मार्गे जातील, तर पुणे रेल्वे स्थानकाकडे जाणारी हलकी वाहने इम्प्रेस गार्डन रोड मार्गे इच्छित स्थळी जातील.
मम्मादेवी चौकातून गोळीबार मैदान चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहील. ही वाहने मम्मादेवी चौक - बिशप स्कूल मार्गे किंवा कमांड हॉस्पिटल मार्गे पुढे इच्छित स्थळी किंवा नेपीयर रस्त्याने पुढे सीडीओ चौकातून इच्छित स्थळी जातील. सीडीओ चौकातून गोळीबार चौकाकडे येणारी वाहतूक नमाज पठण काळात पूर्णतः बंद राहील. लुल्लानगरकडून येणारी वाहने सीडीओ चौकात डावीकडे वळून इच्छित स्थळी जातील. तसेच खटाव बंगला चौकातून उजवीकडे वळून नेपीयर रोडने मम्मादेवी चौकातून सरळ बिशप स्कूल मार्गे जातील. (खटाव बंगला चौकातील उजवीकडील वळणावरील बंदी तात्पुरती उठवण्यात येईल.)
सेव्हन लव्हज चौकाकडून गोळीबार मैदानाकडे येणारी वाहतूक बंद राहील. ही वाहने सॅलसबरी पार्क - सीडीओ चौक - भैरोबानाला मार्गे जातील. जुनी सोलापूर बाजार चौकी चौक ते गोळीबार चौक दरम्यानची वाहतूक बंद राहील. खाणे मारुती चौकाकडून येणारी वाहने पुलगेट डेपो, सोलापूर बाजार चौक मार्गे सरळ नेपीयर रोडने, खटाव बंगला मार्गे किंवा मम्मादेवी चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.लुल्लानगर चौकातून गोळीबारकडे येणारी सर्व जड मालवाहतूक वाहने, प्रवासी वाहतूक करणारी जड वाहने, एसटी बसेस, पीएमपीएमएल बसेस यांना प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. या वाहनांनी लुल्लानगर चौकातून भैरोबानाला चौक किंवा गंगाधाम चौक मार्गे इच्छित स्थळी जावे.
Related
Articles
लिप्यंतरामुळे मोडी लिपीच्या अभ्यासकांना प्रेरणा
14 Jun 2025
अॅट्रॉसिटी कायद्यांर्गत दाखल गुन्ह्यांचा जिल्हा दक्षता बैठकीत आढावा
14 Jun 2025
अजित गव्हाणे पुन्हा अजित पवार गटाच्या मार्गावर
15 Jun 2025
विमान दुर्घटनेतील मृतांना क्रिकेटपटूंनी वाहिली श्रद्धांजली
14 Jun 2025
पाकिस्तानी नागरिकावर ईडीचे आरोपपत्र
17 Jun 2025
विज्ञान शाळेतील प्रयोग शेतकर्यांच्या बांधापर्यंत पोहचावेत
16 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !