काँग्रेस नेते थेन्नाला पिल्लई यांचे निधन   

तिरुअनंतपुरम : केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे माजी अध्यक्ष आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते थेन्नाला बालकृष्ण पिल्लई यांचे शुक्रवारी एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. काही काळापासून वयोमानाशी संबंधित आजारांनी ते ग्रस्त होते. पिल्लई काही वर्षे राजकारणापासून दूर होते. ते दोन वेळा आमदार आणि तीन वेळा राज्यसभा सदस्य होते. त्यांनी दोन टर्ममध्ये केपीसीसीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. ११ मार्च १९३० रोजी दक्षिण कोल्लम जिल्ह्यातील शूरनाद येथे त्यांचा जन्म झाला. तरुण वयातच काँग्रेस प्रभाग समितीचे अध्यक्ष म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.   

Related Articles