जकार्ता : भारताचे युवा बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी शानदार कामगिरी करत इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उप उपांत्य फेरीत मजल मारली. मात्र त्यांना मलेशियाच्या बॅडमिंटनपटूं कडून १९-२१, १६-२१ असा सरळ सेटमध्ये पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. त्यांच्या पराभवामुळे भारतीय बॅडमिंटनपटूंमध्ये निराशा पसरली आहे. त्याआधी त्यांनी डॅनिश बॅडमिंटनपटू रॅस्मस केजर पेडरसन आणि फेडरिक सॉगार्ड मोर्टेनसेन या जोडीविरुद्ध १६-२१, २१-१८, २२-२० असा विजय मिळविला होता.
Fans
Followers