बार्टीच्या विद्यार्थ्यांचे ’जेईई’त यश   

पुणे: सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना जेईई व नीट परीक्षेच्या पूर्वतयारी करिता पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, व नागपूर येथे खाजगी प्रशिक्षण केंद्रामार्फत २०२३-२५ करीता अकरावी व बारावी असे दोन वर्षे कालावधीचे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आले.
 
नुकत्याच प्रकाशीत झालेल्या जेईई परीक्षेच्या निकालामध्ये नागपूर विभागातून शिवम टेंभुर्णेकर, तनिषा दिनेश राक्षे, साक्षी संजय नागरे, सोनल प्रवीण टेंभुर्णे, रचित नंदकिशोर वानखेडे, अजिंक्य भरत मानवटकर, रशिका गुलाब धवसे, जस्मिन सुरेश खांडेकर, लातूर विभागातून - साक्षी शिवराम ढेंबरे, नडगम पियुष खाजप्पा, तृप्ती मारुती घोडके, कांबळे शिवानी महादेव,  नाशिक विभागातून - भाविक योगेश गोहिल, यश गौतम सोनवणे, कौस्तुभ आशुतोष साळवे, अभिषेक जनार्दन आहेर, पुणे विभागातून - हर्षवर्धन विठू नरसुडे, प्रणव संजय जोगदंड व छत्रपती संभाजीनगर विभागातून - सागर प्रकाश जाधव असे एकूण १९ विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नात चांगल्या रॅन्क सह यश संपादीत केलेले आहे.जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेतील यशाबद्दल मंत्री संजय शिरसाट, सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Related Articles