शर्मिष्ठा पानोली हिला हंगामी जामीन   

कोलकाता : समाज माध्यमावर वादग्रस्त टिप्पण्यांसह व्हिडिओ अपलोड केल्याच्या आरोपाखाली अटकेत असणारी शर्मिष्ठा पानोली हिला गुरुवारी कोलकाता उच्च न्यायालयाने हंगामी जामीन मंजूर केला.  तसेच, तिला पोलिस संरक्षण देण्यात यावे, असे आदेशही दिले. शर्मिष्ठाला झालेली अटक बेकायदेशीर असून तिच्याविरुद्ध नमूद केलेले सर्व गुन्हे अदखलपात्र आहेत. अटकेपूर्वी तिला कोणतीही सूचना देण्यात आली नव्हती. नवीन कायद्यानुसार सूचना करणे अनिवार्य आहे, असा युक्तीवाद शर्मिष्ठा हिच्या वकिलांनी सुनावणीदरम्यान केला. न्यायालयाने दहा हजारांच्या हमीपत्रावर हंगामी जामीन मंजूर केला. तसेच, पोलिसांना चौकशीत सहकार्य करण्याचे निर्देश दिले. यासोबतच, परवानगीशिवाय देश सोडून जाऊ नये असे निर्देशही दिले. ‘ऑपरेशन सिंदूर’ संबंधित एक पोस्ट आणि व्डिडिओ शर्मिष्ठाने इंस्टाग्रामवर अपलोड केला होता. 

Related Articles