E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
शासकीय आयटीआयमध्ये ए आय, रोबोटिक्स सह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम
Wrutuja pandharpure
05 Jun 2025
मुंबई
, (प्रतिनिधी) : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये या शैक्षणिक वर्षांपासून सहा नवीन अत्याधुनिक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), इंडस्ट्रियल रोबोटिक्स आदी अभ्यासक्रमांचा या प्रशिक्षणात समावेश आहे. सहा महिने ते दोन वर्षे असा या अभ्यासक्रमांचा कालावधी राहणार आहे. महाराष्ट्रातील तरूण-तरुणींना अत्याधुनिक शिक्षण मिळावे असा या कोर्सेसचा हेतु असल्याची माहिती राज्याचे कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
येत्या शिवराज्याभिषेकदिनी राज्यभरातील १ हजार ९७ आयटीआयमध्ये विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याचेही ते म्हणाले.
मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत लोढा यांनी ही माहिती दिली. राज्यातील युवकांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे तसेच चांगली नोकरी मिळावी, यासाठी त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी लागणार आहे. त्यासाठी कौशल्यविकास विभागाने याबाबत पुढाकार घेतला आहे. राज्यातील शासकीय आयटीआयमध्ये सहा नवीन कोर्सेस या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येणार आहेत. सौरउर्जा तंत्रज्ञ, इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञ, ड्रोन तंत्रज्ञ, थ्रीडी प्रिंटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंडस्ट्रियल रोबोटिक्स या सहा नवीन अभ्यासक्रमांची सुरूवात करण्यात येणार आहे. सहा महिने ते दोन वर्षे असा या अभ्यासक्रमांचा कालावधी असणार असल्याचे लोढा म्हणाले.
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त व्याख्यानमाला
छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून हा राज्याभिषेक दिन असतो. कौशल्य विकास विभागातर्फे दरवर्षी हा दिन साजरा केला जातो. या वर्षीही शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व १ हजार ९७ आयटीआयमध्ये विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे उदघाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ६ जून रोजी सकाळी १० वाजता व्हिडिओद्वारे या व्याख्यानमालेला सुरूवात होणार आहे.
नागरिक कर्तव्ये आणि शिष्टाचार, कुटुंब प्रबोधन, स्वदेशी विचार व संकल्पना, सामाजिक समरसता आणि पर्यावरण संरक्षण असे या व्याख्यानमालेचे विषय असणार आहेत. या विषयातील तज्ज्ञ व्याख्यानात सहभाग घेणार असल्याचे लोढा यांनी सांगितले.
Related
Articles
डिंभे धरणातील जुन्या आठवणींना उजाळा
12 Jun 2025
मोदींकडून जखमींची विचारपूस
14 Jun 2025
प्रत्युत्तर शुल्क पुन्हा जगाच्या मानगुटीवर!
12 Jun 2025
ठेवींवरील व्याज घटणार
15 Jun 2025
मुंबईमध्ये रस्ता खचून बस खड्ड्यात
17 Jun 2025
बाजाराला अर्थप्रवाहाने चालना
17 Jun 2025
डिंभे धरणातील जुन्या आठवणींना उजाळा
12 Jun 2025
मोदींकडून जखमींची विचारपूस
14 Jun 2025
प्रत्युत्तर शुल्क पुन्हा जगाच्या मानगुटीवर!
12 Jun 2025
ठेवींवरील व्याज घटणार
15 Jun 2025
मुंबईमध्ये रस्ता खचून बस खड्ड्यात
17 Jun 2025
बाजाराला अर्थप्रवाहाने चालना
17 Jun 2025
डिंभे धरणातील जुन्या आठवणींना उजाळा
12 Jun 2025
मोदींकडून जखमींची विचारपूस
14 Jun 2025
प्रत्युत्तर शुल्क पुन्हा जगाच्या मानगुटीवर!
12 Jun 2025
ठेवींवरील व्याज घटणार
15 Jun 2025
मुंबईमध्ये रस्ता खचून बस खड्ड्यात
17 Jun 2025
बाजाराला अर्थप्रवाहाने चालना
17 Jun 2025
डिंभे धरणातील जुन्या आठवणींना उजाळा
12 Jun 2025
मोदींकडून जखमींची विचारपूस
14 Jun 2025
प्रत्युत्तर शुल्क पुन्हा जगाच्या मानगुटीवर!
12 Jun 2025
ठेवींवरील व्याज घटणार
15 Jun 2025
मुंबईमध्ये रस्ता खचून बस खड्ड्यात
17 Jun 2025
बाजाराला अर्थप्रवाहाने चालना
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक