E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
फळ भाज्यांच्या दराने ओलांडली शंभरी
Wrutuja pandharpure
05 Jun 2025
पावसामुळे आवक घटली; दरात २० ते ३० टक्क्यांनी वाढ
पुणे
: मान्सूनच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पुणे जिल्हा आणि विभागात पावसाला सुरूवात झाली आहे. पावसामुळे काही भाज्यांचे नुकसान झाले आहे, तर काही भाज्यांची तोडणी थांबली आहे. त्यामुळे एकीकडे बाजारातील फळभाज्यांची आवक घटली आहे. तर दुसरीकडे ग्राहकांकडून भाज्यांना मागणी वाढली आहे. त्यामुळे बहुतांश प्रकारच्या भाज्यांच्या दराने शंभरी ओलांडली आहे. भाज्यांच्या दरात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पावसामुळे दराची स्थिती काही दिवस टिकून राहणार असल्याची माहिती ज्येष्ठ आडते विलास भुजबळ यांनी दिली. मार्केटयार्डातील भाजीपाला विभागात इतर वेळी राज्य आणि परराज्यातून सुमारे ९० ते १०० ट्रकची आवक होते. गेल्या काही दिवसांत ही आवक घटली आहे. राज्यातील काही भागात जोरदार पावसामुळे भाज्यांची काढणी थांबली आहे, तर काही भागात पावसामुळे भाज्यांचे नुकसान झाले आहे. तसेच सद्य:स्थितीत बाजारात विक्रीसाठी दाखल होत असलेल्या भाज्यांमध्ये चांगल्या प्रतीच्या मालाचे प्रमाण कमीच आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या मालाला अधिकचा दर मिळत असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुणे जिल्ह्यासह विभागात जोरदार ते मुसळधार पाऊस पडला. या पावसात काढणीच्या आलेल्या भाज्यांची तोडणी न करता आल्यामुळे नुकसान झाले. तसेच पालेभाज्यांचेही मोठे नुकसान झाले. मध्येच चार दिवस पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे पावसातून शिल्लक राहिलेल्या भाज्यांची तोडणी सुरू झाली होती. मात्र पुन्हा सर्वत्र पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक वाढणार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाढलेले दरही स्थिर राहणार असल्याचा अंदाज विलास भुजबळ यांनी व्यक्त केला.
मेथीची जुडी ७० रूपये
पावसाला सुरूवात झाली की, पालेभाज्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे चांगल्या दर्जाच्या भाज्यांची आवक कमी होते. परिणशमी दर वाढत असतात. बुधवारी किरकोळ बाजारात मेथीच्या गड्डीची ६० ते ७० रूपयांनी विक्री करण्यात आली आतापर्यंतचा हा उच्चांकी दर असल्याचे किरकोळ बाजारातील विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी सांगितले. तसेच कोथींबीर, अंबाडी, कांदापात या पालेभाज्यांचे दरही वाढले आहेत. या भाज्यांच्या गड्डीचा दर २५ ते ४० रूपयापर्यंत असल्याचेही ढमढेरे यांनी सांगितले.
भाज्यांचे किलोचे दर
भाजी
दर
बीन्स
१२० ते १५०
गवार
१२० ते १३०
शेवगा
१०० ते १२०
मटार
१२० ते १६०
दोडका
१०० ते १२०
भेंडी
१ ०० ते १२०
सिमला मिरची
१०० ते १२०
Related
Articles
संगम माहुलीमधील पुलाची शंभर वर्षांची मुदत संपली!
17 Jun 2025
क्रिकेटचा दर्जा राखणे महत्वाचे - कोहली
12 Jun 2025
मुंबईमध्ये रस्ता खचून बस खड्ड्यात
17 Jun 2025
अहमदाबादमध्ये कोसळलेल्या विमान नक्की किती वर्ष सेवेत ?
12 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत ७० तोळे सोन्याचे दागिने, ८० हजारांची रोकड सापडली
17 Jun 2025
पाकिस्तानी नागरिकावर ईडीचे आरोपपत्र
17 Jun 2025
संगम माहुलीमधील पुलाची शंभर वर्षांची मुदत संपली!
17 Jun 2025
क्रिकेटचा दर्जा राखणे महत्वाचे - कोहली
12 Jun 2025
मुंबईमध्ये रस्ता खचून बस खड्ड्यात
17 Jun 2025
अहमदाबादमध्ये कोसळलेल्या विमान नक्की किती वर्ष सेवेत ?
12 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत ७० तोळे सोन्याचे दागिने, ८० हजारांची रोकड सापडली
17 Jun 2025
पाकिस्तानी नागरिकावर ईडीचे आरोपपत्र
17 Jun 2025
संगम माहुलीमधील पुलाची शंभर वर्षांची मुदत संपली!
17 Jun 2025
क्रिकेटचा दर्जा राखणे महत्वाचे - कोहली
12 Jun 2025
मुंबईमध्ये रस्ता खचून बस खड्ड्यात
17 Jun 2025
अहमदाबादमध्ये कोसळलेल्या विमान नक्की किती वर्ष सेवेत ?
12 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत ७० तोळे सोन्याचे दागिने, ८० हजारांची रोकड सापडली
17 Jun 2025
पाकिस्तानी नागरिकावर ईडीचे आरोपपत्र
17 Jun 2025
संगम माहुलीमधील पुलाची शंभर वर्षांची मुदत संपली!
17 Jun 2025
क्रिकेटचा दर्जा राखणे महत्वाचे - कोहली
12 Jun 2025
मुंबईमध्ये रस्ता खचून बस खड्ड्यात
17 Jun 2025
अहमदाबादमध्ये कोसळलेल्या विमान नक्की किती वर्ष सेवेत ?
12 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत ७० तोळे सोन्याचे दागिने, ८० हजारांची रोकड सापडली
17 Jun 2025
पाकिस्तानी नागरिकावर ईडीचे आरोपपत्र
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !