E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
मद्य आणि औषधांवर भारतीयांचा वाढता खर्च
Wrutuja pandharpure
05 Jun 2025
वृत्तवेध
२०२४-२५ या आर्थिक वर्षात भारतीय कुटुंबांनी मद्य आणि औषध या दोन गोष्टींवर सर्वाधिक खर्च केला आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, या दोन्ही श्रेणींमध्ये गेल्या १२ वर्षांमध्ये सर्वसामान्यांचा खर्च सर्वात वेगाने वाढला आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भारतीय कुटुंबांचा दारू आणि तंबाखूवरील खर्च १५.७ टक्क्यांनी वाढला.
या काळात दारूचे प्रमाण वाढलेच, पण अनेक कुटुंबांनी आरोग्यासाठीही खर्च केला. त्यात बरीच वाढ दिसून आली. बारा वर्षांच्या कालावधीमध्ये पहिल्यांदाच १७.४ टक्क्यांनी वाढ झाली. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये या खर्चात ७.२ टक्के वाढ झाली होती. भारतीय कुटुंबांनी या वेळी आरोग्यावर खूप खर्च केला आहे. त्यात औषधे, रुग्णालय आणि डॉक्टरांसाठी केलेल्या खर्चाचा समावेश आहे. हा खर्च घरगुती वापराच्या खर्चाचा एक भाग आहे. जीडीपी वाढीची गणना करण्यासाठी त्याची आकडेवारी वापरली जाते आणि एक वर्षाच्या अंतराने प्रसिद्ध केली जाते. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये अन्न आणि अल्कोहोलव्यतिरिक्त वस्तूंमध्ये फक्त ०.५ टक्के वाढ झाली, तर कपडे आणि पादत्राणे यांच्यावरील खर्च कमी राहिला. श्रीमंत कुटुंबे अन्न उत्पादनांवर कमी आणि जीवनावश्यक वस्तूंवर जास्त खर्च करतात. त्याच वेळी, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्समध्ये प्रचंड वाढ दिसून आली आहे.
गेल्या काही काळात मनोरंजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना फटका बसला आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये यासाठी होणारा खर्च ४.१ टक्क्यांनी कमी झाला. एकूणच, हे क्षेत्र गेल्या वर्षी ७.७ टक्क्यांवरून ५.६ टक्के वाढीपर्यंत घसरले. फेब्रुवारीमध्ये सरकारने जाहीर केलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भारताचा उपभोग खर्च ७.६ टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. सरकार ३० मे रोजी आर्थिक वर्ष २०२५ साठी तात्पुरती आकडेवारी जाहीर करेल.
Related
Articles
घाऊक महागाई दर १४ महिन्यांच्या नीचांकी
17 Jun 2025
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
16 Jun 2025
दोस्ताना संपला
15 Jun 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान केरळमध्ये उतरले
16 Jun 2025
‘टॅरिफ वॉर’वर दुहेरी धोरणाचा उतारा
17 Jun 2025
सुतारवाडी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी
14 Jun 2025
घाऊक महागाई दर १४ महिन्यांच्या नीचांकी
17 Jun 2025
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
16 Jun 2025
दोस्ताना संपला
15 Jun 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान केरळमध्ये उतरले
16 Jun 2025
‘टॅरिफ वॉर’वर दुहेरी धोरणाचा उतारा
17 Jun 2025
सुतारवाडी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी
14 Jun 2025
घाऊक महागाई दर १४ महिन्यांच्या नीचांकी
17 Jun 2025
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
16 Jun 2025
दोस्ताना संपला
15 Jun 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान केरळमध्ये उतरले
16 Jun 2025
‘टॅरिफ वॉर’वर दुहेरी धोरणाचा उतारा
17 Jun 2025
सुतारवाडी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी
14 Jun 2025
घाऊक महागाई दर १४ महिन्यांच्या नीचांकी
17 Jun 2025
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
16 Jun 2025
दोस्ताना संपला
15 Jun 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान केरळमध्ये उतरले
16 Jun 2025
‘टॅरिफ वॉर’वर दुहेरी धोरणाचा उतारा
17 Jun 2025
सुतारवाडी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी
14 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !