E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
व्यासपीठ
वाचक लिहितात
Wrutuja pandharpure
05 Jun 2025
लाडकी बहीण योजनेत पारदर्शकता हवी
मध्य प्रदेशात नुकताच उघड झालेला सर्पदंश घोटाळा आणि महाराष्ट्रातील लाडकी बहिण योजनेत सापडलेले २२०० शासकीय कर्मचारी - या दोन घटना एक गंभीर वास्तव अधोरेखित करतात: सरकारी योजनांना मारक ठरणारे झारीतले शुक्राचार्य आपल्याच यंत्रणेत बसलेले आहेत. सर्पदंश प्रकरणात १०१ बनावट मृत्यू दाखवून मदतीचा पैसा हडप करण्यात आला. अनेक आदिवासी कुटुंबांना तर त्यांच्या नावे निधी मिळाल्याची कल्पनाही नव्हती. दुसरीकडे, लाडकी बहिण योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना आधार देण्याचा असताना, त्याच योजनेंतर्गत शासनातीलच हजारो कर्मचारी लाभार्थी म्हणून नोंदले गेले. या दोन्ही प्रकरणांतून एकच गोष्ट स्पष्ट होते - जनतेच्या भल्यासाठी राबवलेल्या योजना आतूनच पोखरल्या जात आहेत. योजनांचा गाजावाजा होतो, पण त्यांची अंमलबजावणी करताना पारदर्शकतेचा, निष्ठेचा आणि नैतिकतेचा अभाव दिसतो. सरकारने या झारीतल्या शुक्राचार्यांना ओळखून कठोर कारवाई केली पाहिजे. अन्यथा या योजनांचा लाभ गरजूंना कधीच मिळणार नाही. पारदर्शक यंत्रणा, डिजिटल पडताळणी आणि तटस्थ चौकशी हाच या भ्रष्ट व्यवस्थेवर उपाय आहे.
दीपक गुंडये, वरळी.
यूपीएससीत मराठी टक्का
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा - २०२४ चा अंतिम निकाल जाहीर केला. या परीक्षेत महाराष्ट्रातील ९० हून अधिक विद्यार्थी यशस्वी झाले. पहिल्या शंभर यशस्वी विद्यार्थ्यांत ७ मराठी उमेदवार आहेत. महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब आहे. पूर्वी या परीक्षेत यशस्वी होणार्या विद्यार्थ्यांत मराठी विद्यार्थ्यांची संख्या नगण्य होती; पण मागील काही वर्षांपासून या परीक्षेतही मराठी मुलांनी बाजी मारून मराठी मुलेही कशात कमी नाही हे दाखवून दिले आहे. या परीक्षेत यशस्वी झालेले बहुतेक विद्यार्थी मराठी माध्यमातून शिकलेले आहेत हे विशेष. हे यश पाहून ’मराठी पाऊल पडते पुढे!’ असेच म्हणावे लागेल.
श्याम ठाणेदार, दौंड जि. पुणे
सार्वजनिक सुरक्षेचे भान ठेवा!
हरयानातील हिसार येथील (कु)प्रसिद्ध यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. तिला अटक करण्यात आल्यानंतर पाकिस्तानसाठी हेरगिरी करणार्या आणखी काही लोकांची धरपकड करण्यात आली. या लोकांच्या देशद्रोही कृत्यामुळे त्यांना कायद्यानुसार कठोर शिक्षा होईलच; पण समाज माध्यमांचा वापर किती घातक पद्धतीने केला जाऊ शकतो हे या घटनेने समोर आले आहे. सध्याचा जमाना रील्सचा आहे. सर्व ताळतंत्र सोडून रील्स बनवायचे, समाज माध्यमांवर टाकायचे आणि जास्तीत जास्त लाईक्स आणि कॉमेंट्स मिळविण्यासाठी प्रयत्न करायचा, असे व्यसनच सर्व वयोगटातील समाज माध्यमांच्या ‘रीलस्टार्स’ना लागले आहे. आपण हे व्हिडिओ कुठे चित्रित करत आहोत, विषय आणि हे ठिकाण संवेदनशील आहे का? सार्वजनिक सुरक्षेला बाधा आणणारे आहे का? याचा विचारही हे व्लॉगर्स करत नाहीत. ज्योती मल्होत्राने देशद्रोही कृत्यांसाठी जाणीवपूर्वक समाज माध्यमांचा वापर केला; पण आपणही रील्स-व्लॉगच्या माध्यमातून कळत नकळत सायबर चोरांना, देशद्रोह्यांना आपली संवेदनशील माहिती पुरवत असतो याचे भान उत्साही नेटकर्यांनी ठेवणे गरजेचे आहे.
प्रदीप मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई
हुंडा देणारे - घेणारे दोघेही दोषीच!
मुळशी तालुक्यातील भुकूम गावातील वैष्णवी शशांक हगवणे या २३ वर्षीय विवाहितेच्या मृत्यूचे प्रकरण सद्या गाजत आहे यामुळे हुंडा पद्धतीचे अनेक कंगोरे उजेडात आले आहेत कायद्याने हुंडा घेणे अथवा देणे गुन्हा असताना असा राजरोसपणे खुलेआम कस्पटे आणि हगवणे कुटुंबीयांनी हुंड्याच्या सौदा केला आणि एका निष्पाप, निरागस मुलीला आयुष्यातून उठवले जेवढा हुंडा घेणारा दोषी आहे तितकाच देणारा सुद्धा गुन्हेगार आहे वैष्णवी एकच विवाहिता नाही यासारख्या महाराष्ट्रातील अनेक जणींचा जीव जात असेल कायदे आहेत मात्र त्याची योग्य अंमलबजावणी होत नाही हीच तर सर्वात मोठी समस्या आहे. करण्यास परावृत होतात आरोपींना या गुन्ह्यातून वाचविण्यासाठी वकील वैष्णवीवर नको ते शिंतोडे उडवत आहेत ते चुकीचे वाटते हल्ली तुम्ही तुमच्या मुलींचा खर्च बघा, तुम्ही तुमच्या मुलीला सजवा असं बोलून अप्रत्यक्षपणे हुंडा मागितला जातो. तर काही ठिकाणी आम्हाला काहीच नको, तुमच्या मुलीला सहखुशीनं जे द्यायचं ते द्या अशा छुप्या पद्धतीनं हुंडा घेतला जातो.
राजू जाधव, मांगूर जि. बेळगांव
Related
Articles
महेंद्रसिंह धोनीला आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये नामांकन
14 Jun 2025
रस्त्यांवरील अडथळे उद्यापर्यंत दूर करा;अन्यथा १० कोटींचा दंड : उपमुख्यमंत्री पवार
15 Jun 2025
एअर इंडियाच्या विमानात पुन्हा तांत्रिक बिघाड
17 Jun 2025
विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटू दीर्घ पटेलचा मृत्यू
18 Jun 2025
व्हाइट हाऊसमध्ये मुनीर यांना मेजवानी
19 Jun 2025
घटस्फोटानंतर मुलांचा ताबा वडिलांकडे
16 Jun 2025
महेंद्रसिंह धोनीला आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये नामांकन
14 Jun 2025
रस्त्यांवरील अडथळे उद्यापर्यंत दूर करा;अन्यथा १० कोटींचा दंड : उपमुख्यमंत्री पवार
15 Jun 2025
एअर इंडियाच्या विमानात पुन्हा तांत्रिक बिघाड
17 Jun 2025
विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटू दीर्घ पटेलचा मृत्यू
18 Jun 2025
व्हाइट हाऊसमध्ये मुनीर यांना मेजवानी
19 Jun 2025
घटस्फोटानंतर मुलांचा ताबा वडिलांकडे
16 Jun 2025
महेंद्रसिंह धोनीला आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये नामांकन
14 Jun 2025
रस्त्यांवरील अडथळे उद्यापर्यंत दूर करा;अन्यथा १० कोटींचा दंड : उपमुख्यमंत्री पवार
15 Jun 2025
एअर इंडियाच्या विमानात पुन्हा तांत्रिक बिघाड
17 Jun 2025
विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटू दीर्घ पटेलचा मृत्यू
18 Jun 2025
व्हाइट हाऊसमध्ये मुनीर यांना मेजवानी
19 Jun 2025
घटस्फोटानंतर मुलांचा ताबा वडिलांकडे
16 Jun 2025
महेंद्रसिंह धोनीला आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये नामांकन
14 Jun 2025
रस्त्यांवरील अडथळे उद्यापर्यंत दूर करा;अन्यथा १० कोटींचा दंड : उपमुख्यमंत्री पवार
15 Jun 2025
एअर इंडियाच्या विमानात पुन्हा तांत्रिक बिघाड
17 Jun 2025
विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटू दीर्घ पटेलचा मृत्यू
18 Jun 2025
व्हाइट हाऊसमध्ये मुनीर यांना मेजवानी
19 Jun 2025
घटस्फोटानंतर मुलांचा ताबा वडिलांकडे
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
3
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
4
अपघातग्रस्त विमानातील २३० प्रवाशांची यादी
5
१ जुलैपासून आधार जोडणीशिवाय तात्काळ तिकीट नाही
6
इस्रायलचा इराणवर हल्ला