E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
कर्नाटक हापूसचा हंगाम आणखी पंधरा दिवस
Wrutuja pandharpure
04 Jun 2025
१० हजार पेट्यांची रोज आवक
पुणे
: कर्नाटक हापूसचा हंगाम शेवटच्या टप्यात आला आहे. येत्या पंधरा दिवसांत हा हंगाम संपणार आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे कर्नाटक हापूसला ग्राहकांकडून चांगली मागणी होत असल्याची माहिती व्यापारी रोहन उरसळ यांनी दिली.
कोकणातील हापूस प्रमाणेच कर्नाटकांतील आंब्याच्या झाडांना यावेळी फळधारणा कमी होती. त्यामुळे यावेळी कर्नाटक हापूसचा हंगाम उशिराने सुरू झाला होता. एप्रिल महिन्यापर्यंत आवक मर्यादित होती. मात्र, मे महिन्यात मोठ्या प्रमाणात आवक वाढली. त्यानंतर पावसाला सुरूवात झाल्याने या आंब्याला पावसाचा मोठा फटका बसला. पावसामुळे मागणी कमी झाली, तसेच दरही कमी झाले. त्यामुळे त्याचा आर्थिक फटका शेतकर्यांसह व्यापार्यांनाही सहन करावा लागला. आता मागणी वाढल्याने दरही चांगले मिळत असल्याचे रोहन उरसळ यांनी नमूद केले.
कर्नाटकातील टुकमुर या भागातून हापूसची आवक होत आहे. ३ ते ४ डझनाच्या पेटीला ८०० ते १२०० रूपये दर मिळत आहे. मार्केटयार्डातील फळविभागात रोज १० हजार लाकडी पेट्यांची, तर ३ ते ४ हजार बॉक्सची आवक होत आहे. मे महिन्यात कर्नाटक हापूसची आवक २५ हजार पेट्यापर्यंत गेली होती. कर्नाटकातील हापूस आंब्यासह अन्य आंब्यांची प्रामुख्याने आवक पुण्यात होत आहे. मुंबईतील बाजारातही काही प्रमाणात आवक होत आहे. ही आवक येत्या १५ ते २० जूनपर्यंत राहू शकेल. त्यानंतर मात्र यंदाचा कर्नाटक हापूसचा हंगाम संपणार असल्याचेही रोहन उरसळ यांनी स्पष्ट केले.
मागील हंगामात झालेला अधिकचा पाऊस. त्यानंतर लांबलेला परतीचा पाऊस आणि नंतर कमी प्रमाणात थंडी पडल्याने त्याचा आंब्याच्या झाडांवर परिणाम झाला होता. त्यानंतर आलेल्या वादळात झाडांचा मोहोर गळून पडला होता. या सर्व कारणामुळे यंदा कर्नाटकातील झाडांना फळधारणा कमी होती. मात्र, विक्रीसाठी बाजारात दाखल झालेल्या फळांचा दर्जा चांगला आहे. त्यामुळे पाऊस उघडल्यानंतर ग्राहक कर्नाटक हापूसला प्राधान्य देत असल्याचेही रोहन उरसळ यांनी सांगितले.
घाऊक बाजारातील आंब्याचे दर
आंबा
डझन/किलो
दर
हापूस
३ ते ४ डझन ८०० ते १२००
हापूस
२ डझन
३०० ते ५००
पायरी
४ डझन
६०० ते ८००
लालबाग
१ किलो
२५ ते ३५
बदाम
१ किलो
२५ ते ३५
Related
Articles
चासकमान धरणाजवळील पुलाला भगदाड
17 Jun 2025
सुरुची सिंगला सुवर्णपदक
14 Jun 2025
निदर्शनांचे पेव २५ शहरांमध्ये ट्रम्प यांचा निषेध
12 Jun 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान केरळमध्ये उतरले
16 Jun 2025
घराच्या बाल्कनीत खेळताना दुसर्या मजल्यावरून पडूनही चिमुकली बचावली!
13 Jun 2025
विमान अपघातातील दृश्ये भयानक : स्टॉर्मर
13 Jun 2025
चासकमान धरणाजवळील पुलाला भगदाड
17 Jun 2025
सुरुची सिंगला सुवर्णपदक
14 Jun 2025
निदर्शनांचे पेव २५ शहरांमध्ये ट्रम्प यांचा निषेध
12 Jun 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान केरळमध्ये उतरले
16 Jun 2025
घराच्या बाल्कनीत खेळताना दुसर्या मजल्यावरून पडूनही चिमुकली बचावली!
13 Jun 2025
विमान अपघातातील दृश्ये भयानक : स्टॉर्मर
13 Jun 2025
चासकमान धरणाजवळील पुलाला भगदाड
17 Jun 2025
सुरुची सिंगला सुवर्णपदक
14 Jun 2025
निदर्शनांचे पेव २५ शहरांमध्ये ट्रम्प यांचा निषेध
12 Jun 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान केरळमध्ये उतरले
16 Jun 2025
घराच्या बाल्कनीत खेळताना दुसर्या मजल्यावरून पडूनही चिमुकली बचावली!
13 Jun 2025
विमान अपघातातील दृश्ये भयानक : स्टॉर्मर
13 Jun 2025
चासकमान धरणाजवळील पुलाला भगदाड
17 Jun 2025
सुरुची सिंगला सुवर्णपदक
14 Jun 2025
निदर्शनांचे पेव २५ शहरांमध्ये ट्रम्प यांचा निषेध
12 Jun 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान केरळमध्ये उतरले
16 Jun 2025
घराच्या बाल्कनीत खेळताना दुसर्या मजल्यावरून पडूनही चिमुकली बचावली!
13 Jun 2025
विमान अपघातातील दृश्ये भयानक : स्टॉर्मर
13 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !