गौतम गंभीर यांनी घेतले कामाख्या देवीचे दर्शन   

आठ महिन्यांत दुसर्‍यांदा देवीच्या चरणी

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पुन्हा एकदा माँ कामाख्याचा आश्रय घेतला. इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वाच्या कसोटी मालिकेपूर्वी, त्याने गुवाहाटीतील प्रसिद्ध कामाख्या देवी मंदिरात प्रार्थना करून आईचे आशीर्वाद घेतले. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सप्टेंबर २०२४ नंतर गंभीरने या मंदिराला भेट देण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी, २०२४च्या आयपीएलमध्ये केकेआरचे मार्गदर्शक असतानाही त्यांनी  माँ कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते. 
 
गौतम गंभीरने भेट दिलेले कामाख्या देवी मंदिर भारतातील प्रमुख शक्तीपीठांमध्ये गणले जाते. श्रद्धा आणि तंत्र साधनेचा हा एक अद्भुत संगम आहे. गुवाहाटीतील नीलाचल टेकडीवर असलेले हे मंदिर आसामची राजधानी दिसपूरपासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर आहे. 
 
भारतीय क्रिकेट संघ २० जूनपासून इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका सुरू करणार आहे, जी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५-२७ सायकलची पहिली मालिका असेल. या दौर्‍यात संघाची कमान युवा फलंदाज शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. तर यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या मालिकेकडे टीम इंडियासाठी एका नव्या युगाची सुरुवात म्हणून पाहिले जात आहे.
 

Related Articles