E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मनोरंजन
निसर्गाच्या कुशीत रंगलेली चित्तथरारक कथा
Wrutuja pandharpure
20 May 2025
रुपेरी पडदा : कल्पना खरे
गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपटांचे स्वरुप काहीसे बदललेले दिसते. विशेषत: परदेशातील चित्रण, आकर्षक आऊट डोअर लोकेशन त्यामुळे निसर्ग सुंदर सिनेमॅटोग्राफी यांचे प्रमाण लक्षणीय आहे. सध्या प्रदर्शित होत असलेला मराठी चित्रपट ‘बंजारा’ हे याचे उत्तम उदाहरण होईल. सिक्कीमच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर चित्रित झालेल्या या चित्रपटात तीन जिवलग मित्रांचा भावनांनी भरलेला आणि रहस्यांनी गुंतलेला प्रवास याद्वारे उलगडताना दिसतो.
समीर (सक्षम कुलकर्णी व भरत जाधव), अविनाश (स्नेह पोंक्षे व शरद पोंक्षे) आणि विवेक (आदित्य धनराज व सुनील बर्वे) हे तिघे जिवलग मित्र असतात. समीरच्या आजोबांचे नुकतेच निधन झालेले असते. त्यांना गिरीभ्रमणाचा, त्यातही विशेषत: विविध शिवलिंग शोधून काढण्याचा छंद असतो. त्यांच्या प्रवास डायरीमध्ये अशा अनेक ठिकाणांची नोंद असते; पण एका पानावरील दुर्गम भागातील शिवलिंग शोधून काढण्याची इच्छा अपूर्ण राहिलेली असते. त्यांच्या मृत्यूनंतर तरी ही इच्छा पूर्ण करावी म्हणून त्यांचा अस्थीकलश घेऊन तिथे जायचा बेत समीर करतो. इतर दोघेही त्याच्या बरोबर जायला तयार होतात. त्या प्रवासात त्यांना कसे अनपेक्षित आणि थरारक अनुभव येतात, त्यामुळे त्यांच्या जीवनात कसे बदल घडतात त्यांचा संकल्प पूर्ण होतो की नाही हे चित्रपट पाहिल्यावरच समजेल.
चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन स्नेह शरद पोंक्षे यांनी केलेले आहे. या तीन मित्रांच्या मोठ्या वयातील भूमिकेत भरत जाधव, शरद पोंक्षे, सुनील बर्वे हे दिग्गज अभिनेते आहेत. सर्वांचाच अभिनय उत्तम आहे. चित्रपटाचे संगीत अवधूत गुप्ते यांचे असून अत्यंत प्रभावी झाले आहे. विशेषत: बंजारे... बंजारे... आणि होऊया रिचार्ज ही गाणी मनात रूंजी घालत राहतात. सुमारे चौदा-पंधरा हजार फूट उंचीवर सिक्कीम पर्वतरांगांमध्ये केलेले चित्रीकरण अप्रतिम झाले आहे. माझ्या माहितीप्रमाणे मराठी चित्रपटांत हे प्रथमच दिसले आहे. दिग्दर्शनाच्या बाबतीत स्नेह यशस्वी झाला आहे; परंतु पटकथेच्या बाबतीत काहीशी निराशा होते. विशेषत: पूर्वार्धात कथानक फारच संथ पुढे सरकते. त्याच त्याच संवादांची पुनरावृत्ती खटकते. भरत जाधवची पत्नी व मुलगी या दोघींचे अभिनय कृत्रिम वाटतात. त्या मानाने अमांडाच्या भूमिकेतील फ्रँकी जे. मिशेलने बर्यापैकी प्रयत्न केला आहे. चित्रपटाचा आकर्षक ट्रेलर पाहून मनात जी उत्सुकता होती त्याची अपेक्षा मात्र तितकीशी पूर्ण होत नाही.अशा काही त्रुटी असतील, तरी अप्रतिम निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी चित्रपट सहकुटुंब जरूर बघावा.
बंजारा
लेखक-दिग्दर्शन :- स्नेह शरद पोंक्षे.
संगीत :- अवधूत गुप्ते
कलाकार : भरत जाधव, शरद पोंक्षे, सुनील बर्वे, सक्षम कुलकर्णी, स्नेह पोंक्षे, आदित्य धनराज.
Related
Articles
पोलिसांनी पकडला तीन लाखांचा गुटखा
01 Jun 2025
पंतप्रधान मोदींनी घेतली शुभम द्विवेदीच्या कुटुंबीयांची भेट
31 May 2025
गुजरातच्या पराभवानंतर आशिष नेहराच्या मुलांना रडू कोसळले
02 Jun 2025
विकास दर मंदावला
31 May 2025
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?
01 Jun 2025
सिंधू दुसर्या फेरीत
04 Jun 2025
पोलिसांनी पकडला तीन लाखांचा गुटखा
01 Jun 2025
पंतप्रधान मोदींनी घेतली शुभम द्विवेदीच्या कुटुंबीयांची भेट
31 May 2025
गुजरातच्या पराभवानंतर आशिष नेहराच्या मुलांना रडू कोसळले
02 Jun 2025
विकास दर मंदावला
31 May 2025
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?
01 Jun 2025
सिंधू दुसर्या फेरीत
04 Jun 2025
पोलिसांनी पकडला तीन लाखांचा गुटखा
01 Jun 2025
पंतप्रधान मोदींनी घेतली शुभम द्विवेदीच्या कुटुंबीयांची भेट
31 May 2025
गुजरातच्या पराभवानंतर आशिष नेहराच्या मुलांना रडू कोसळले
02 Jun 2025
विकास दर मंदावला
31 May 2025
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?
01 Jun 2025
सिंधू दुसर्या फेरीत
04 Jun 2025
पोलिसांनी पकडला तीन लाखांचा गुटखा
01 Jun 2025
पंतप्रधान मोदींनी घेतली शुभम द्विवेदीच्या कुटुंबीयांची भेट
31 May 2025
गुजरातच्या पराभवानंतर आशिष नेहराच्या मुलांना रडू कोसळले
02 Jun 2025
विकास दर मंदावला
31 May 2025
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?
01 Jun 2025
सिंधू दुसर्या फेरीत
04 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर