अभिनेत्री नुसरत फारिया हिला अटक   

ढाका : बांगलादेशचे संस्थापक मुजीबुर रहमान यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात माजी पंतप्रधान शेख हसीना यांची भूमिका साकारणार्‍या अभिनेत्री नुसरत फारियाला अटक करण्यात आली आहे. रविवारी बांगलादेशची राजधानी ढाका येथील शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिला खुनाच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. 
 
जुलै २०२४ मध्ये शेख हसीना यांच्या सरकारविरोधात मोठे आंदोलन उसळले होते. याच आंदोलनाशी संबंधित एका विद्यार्थ्याच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप नुसरतसह १७ जणांवर आहे. या प्रकरणातच तिला परदेशी जाण्यापूर्वी विमानतळावर अटक करण्यात आले. ती थायलंडला निघाली होती. ढाका येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर मायग्रेशन करण्याआधीच्या चेकपॉइंटवर तिला रोखण्यात आले. पोलिसांनी तिच्याविरोधात अटक वॉरंटही जारी केले होते.

Related Articles