केळी बाजार परिसरात कचर्‍याची समस्या   

पुणे : मार्केटयार्डातील केळी बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साठल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. या कचर्‍यावर मच्छर आणि माशा बसत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बाजार समितीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर व बाजार समितीचे संचालक संतोष नांगरे यांनी या परिसरातील कचर्‍याची पाहणी केली. 
 
केळी बाजार परिसरात अनेक दिवसापासून कचरा साचला होता. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे नागरिक आजारी पडत होते. त्यामुळे प्रेमनगर, स्वप्नपूर्ती सोसायटीतील नागरिक तसेच व्यापारी, आडते, टेम्पो चालकांकडून स्वच्छता होत नसल्याची तक्रारी सातत्याने केल्या जात होत्या. त्यामुळे या परिसराला प्रत्यक्ष भेट देवून डॉ. राजाराम धोंडकर व संतोष नांगरे यांनी पाहणी केली. परिसराची पाहणी करून कचर्‍यांचे ढिग पाहिल्यानंतर सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी तात्काळ कचरा उचलण्याच्या सूचना संबधित विभागाला दिल्या. त्यानंतर त्या परिसरातील कचरा उचलण्याचे काम सुरू झाले आहे. बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, सचिव डॉ. राजाराम धोंडकर, विभाग प्रमुख प्रशांत गोते, आशिष राऊत यांच्या सहकार्यामुळे सबंधित ठिकाणचा कचरा उचलला जात आहे. या भेटीवेळी संजय साष्टे, दीपक जाधव, संतोष ताकवले, धोंडीबा ढेबे आदी उपस्थित होते.

Related Articles