सूड नव्हता.. तो न्याय होता   

भारतीय लष्कराकडून चित्रफित प्रसारित

नवी दिल्ली : भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरबाबतची एक दृकश्राव्य चित्रफित प्रसारित केली आहे. त्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवरचा सूड नव्हता तर तो निष्पाप नागरिकांना दिलेला न्याय होता, असे म्हटले आहे.
 
लष्कराच्या पश्चिम कमांडने या चित्रफितीत पाकिस्तानवर केलेल्या आक्रमक कारवाईची झलक दाखविली आहे. संघर्षबंदीचे उल्लंघन करणार्‍या पाकिस्तानला धडा शिकविला याचे दर्शन घडवले आहे. त्यामध्ये पाकिस्तानी चौक्या तोफा आणि छोट्या शस्त्रांनी कशा उडविल्या हे दाखवले आहे. तसेच नागरिकांसोबत जवानांनी घुसखोरीचा डावही हाणून पाडला होता. तसेच  आक्रमक हल्ला चढवून पाकिस्तानी सैनिकांना चौक्या सोडायला भाग पाडल्याची दृश्ये त्यात दाखविली आहेत. 

Related Articles