E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
मजुराला लुटणार्या रिक्षाचालकाला साथीदारासह अटक
Wrutuja pandharpure
18 May 2025
पुणे
: घरी जाणार्या मजुराला तो चालला आहे त्याच ठिकाणी चाललो असल्याचे सांगून त्याला रिक्षातून डुक्कर खिंडीमध्ये नेऊन मारहाण करून लुटणार्या रिक्षाचालक व त्याच्या साथीदाराला वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली.आदित्य राम वाघमारे (वय २३, करिश्मा चौक, कोथरूड) आणि सत्येंद्र मिठाईलाल जयस्वाल (वय २०, एकता कॉलनी, वारजे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका मजुरीने तक्रार दिली होती.
तक्रारदार हे सोमवारी (१२ मे) त्यांचे काम आटोपून त्याच्या बावधन येथील घरी जाण्यासाठी वारजे पुलाखाली उभा होता. एका रिक्षाचालकाने त्यांना आम्ही तिकडेच चाललो आहोत असे सांगत रिक्षात बसवले. पुढे बावधनकडे जाणार्या सेवा रस्त्यावर त्यांनी रिक्षा थांबवली. त्यानंतर रिक्षाचालकासह रिक्षात आधीपासूनच बसलेल्या एका चोरट्याने त्यांना दमदाटी करत त्यांच्या खिशातील २ हजार रोख आणि एक मोबाइल हिसकावून घेतला. त्यानंतर तक्रारदाराला ‘पोलिसांकडे गेलास तर मारून टाकू’ अशी धमकी दिली.
याप्रकरणी, तक्रार दाखल होताच, पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध सुरू केला. पोलिसांनी वेगवेगळ्या रिक्षा स्टँडला आरोपींचा शोध घेतला. पोलीस शोधत असलेल्या वर्णनाची रिक्षा वारजे जकात नाक्यावर असल्याची माहिती अंमलदार विजय भुरुक यांना खबर्याकडून मिळाली. त्यावरून पोलिसांनी कर्वेनगर परिसरात रिक्षाचा शोध घेऊन, आदित्य वाघमारे याला ताब्यात घेतले. त्याने सत्येंद्र जयस्वाल याच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरलेला सर्व मुद्देमाल हस्तगत केला.वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश बडाख यांच्या सूचनेनुसार सहायक निरीक्षक रणजित मोहिते, पोलीस अंमलदार धनंजय देशमुख, विजय भुरुक, विक्रम खिलारी, संभाजी दराडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Related
Articles
दोन्ही पवार एकत्र येण्यास तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचा विरोध
31 May 2025
रशियात पूल कोसळल्याने दोन रेल्वे घसरल्या
02 Jun 2025
कुंपणे नाकारणारी लेखिका!
01 Jun 2025
कास-पठारावरील फुलोत्सव ऑगस्टनंतरच
02 Jun 2025
विवाह संस्कार, हुंडा आणि समाजधारणा
05 Jun 2025
व्याजदर घटले
06 Jun 2025
दोन्ही पवार एकत्र येण्यास तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचा विरोध
31 May 2025
रशियात पूल कोसळल्याने दोन रेल्वे घसरल्या
02 Jun 2025
कुंपणे नाकारणारी लेखिका!
01 Jun 2025
कास-पठारावरील फुलोत्सव ऑगस्टनंतरच
02 Jun 2025
विवाह संस्कार, हुंडा आणि समाजधारणा
05 Jun 2025
व्याजदर घटले
06 Jun 2025
दोन्ही पवार एकत्र येण्यास तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचा विरोध
31 May 2025
रशियात पूल कोसळल्याने दोन रेल्वे घसरल्या
02 Jun 2025
कुंपणे नाकारणारी लेखिका!
01 Jun 2025
कास-पठारावरील फुलोत्सव ऑगस्टनंतरच
02 Jun 2025
विवाह संस्कार, हुंडा आणि समाजधारणा
05 Jun 2025
व्याजदर घटले
06 Jun 2025
दोन्ही पवार एकत्र येण्यास तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचा विरोध
31 May 2025
रशियात पूल कोसळल्याने दोन रेल्वे घसरल्या
02 Jun 2025
कुंपणे नाकारणारी लेखिका!
01 Jun 2025
कास-पठारावरील फुलोत्सव ऑगस्टनंतरच
02 Jun 2025
विवाह संस्कार, हुंडा आणि समाजधारणा
05 Jun 2025
व्याजदर घटले
06 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर