E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
कर्जाचा व्याजदर कमी होणार?
Samruddhi Dhayagude
17 May 2025
वृत्तवेध
रिझर्व बँक २०२५-२६ या आर्थिक वर्षात रेपो दरात १२५-१५० बेसिस पॉइंट्स कपात करू शकते. स्टेट बँकेच्या नवीन संशोधन अहवालानुसार मार्च २०२५ पर्यंत ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) आधारित महागाई दर ३.३४ टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतो. ती गेल्या ६७ महिन्यांतील सर्वात कमी पातळी असेल. या परिस्थितीमुळे रिझर्व बँक व्याजदर कमी करू शकते.
रेपो दरात कपात
फेब्रुवारी आणि एप्रिल २०२५ मध्ये आधीच ०.५० टक्के कपात करण्यात आली आहे. जून आणि ऑगस्ट २०२५ मध्ये आणखी ७५ बेसिस पॉइंट्सची कपात शक्य आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या दुसर्या सहामाहीत (ऑक्टोबर २०२५-मार्च २०२६) अतिरिक्त ०.५० टक्के कपात अपेक्षित आहे. मार्च २०२६ पर्यंत रेपो दर पाच ते सव्वा पाच टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. तो रिझर्व बँकेच्या ५.६५ टक्क्यांच्या तटस्थ दरापेक्षा कमी असेल.
महागाई दराचा कल
२०२५-२६ च्या पहिल्या तिमाही (एप्रिल-जून)मध्ये महागाई दर तीन टक्क्यांपेक्षा कमी राहण्याची अपेक्षा आहे. अन्नधान्याच्या किमतींमध्ये कोणताही मोठा धक्का न बसल्यास या आर्थिक वर्षामध्ये सरासरी किरकोळ महागाई दर ३.७ ते ३.८ टक्के राहू शकतो.
बँक ठेवींच्या दरांवर परिणाम
* व्याजदरात कपात केल्यास मुदत ठेवींवरील व्याजदर सुमारे एक टक्क्याने कमी होऊ शकतात.
* ठेवींपेक्षा कर्जवाढ जलद असल्याने बँकिंग क्षेत्राच्या कर्ज-ठेवीतील तफावत वाढून एनआयएम (निव्वळ व्याज मार्जिन)वर दबाव येऊ शकतो.
* स्टेट बँकेच्या अहवालानुसार भारतातील महागाई दर नियंत्रणात आहे. आर्थिक वाढ स्थिर आहे आणि जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर रिझर्व बँक प्रमुख व्याजदरांमध्ये मोठी कपात करू शकते. यामुळे कर्ज घेणे स्वस्त होऊ शकते; परंतु बँक ठेवींवरील व्याजदेखील कमी होऊ शकते.
Related
Articles
ऑस्ट्रेलियाच्या भारत दौर्याचे वेळापत्रक जाहीर
30 May 2025
भरधाव मोटारीने बारा जणांना उडवले
01 Jun 2025
हत्यारे दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
31 May 2025
चार बांगलादेशींना ताब्यात घेतले
30 May 2025
दिल्ली विभागातून रजित गुप्ता पहिला
03 Jun 2025
अमरनाथ यात्रेकरुंना सुविधा पुरविणार
31 May 2025
ऑस्ट्रेलियाच्या भारत दौर्याचे वेळापत्रक जाहीर
30 May 2025
भरधाव मोटारीने बारा जणांना उडवले
01 Jun 2025
हत्यारे दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
31 May 2025
चार बांगलादेशींना ताब्यात घेतले
30 May 2025
दिल्ली विभागातून रजित गुप्ता पहिला
03 Jun 2025
अमरनाथ यात्रेकरुंना सुविधा पुरविणार
31 May 2025
ऑस्ट्रेलियाच्या भारत दौर्याचे वेळापत्रक जाहीर
30 May 2025
भरधाव मोटारीने बारा जणांना उडवले
01 Jun 2025
हत्यारे दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
31 May 2025
चार बांगलादेशींना ताब्यात घेतले
30 May 2025
दिल्ली विभागातून रजित गुप्ता पहिला
03 Jun 2025
अमरनाथ यात्रेकरुंना सुविधा पुरविणार
31 May 2025
ऑस्ट्रेलियाच्या भारत दौर्याचे वेळापत्रक जाहीर
30 May 2025
भरधाव मोटारीने बारा जणांना उडवले
01 Jun 2025
हत्यारे दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
31 May 2025
चार बांगलादेशींना ताब्यात घेतले
30 May 2025
दिल्ली विभागातून रजित गुप्ता पहिला
03 Jun 2025
अमरनाथ यात्रेकरुंना सुविधा पुरविणार
31 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
4
चेरीचा हंगाम बहरला
5
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
6
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार