नीलेश चव्हाणने हगवणे कुटुंबाला गुन्हा करण्यासाठी दिली चिथावणी   

पोलिसांकडून न्यायालयात माहिती 

पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सासू लता, नणंद करिश्मा आणि पती शशांक याचे मोबाईल नीलेश चव्हाणकडून जप्त करण्यात आले आहेत. नीलेश चव्हाण व इतर आरोपींमध्ये मोबाईलच्या माध्यमातून झालेले संभाषण व संदेश यांचा तपास सुरू आहे. चव्हाण याने इतर आरोपींना गुन्हा करण्यासाठी चिथावणी  दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात दिली. 
 
वैष्णवी यांच्या मुलाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या कस्पटे कुटुंबीयांना पिस्तुलाचा धाक दाखवत धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला आरोपी नीलेश चव्हाण आणि हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ करून वैष्णवी हगवणे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेला सासरा राजेंद्र व दीर सुशील हगवणेंची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तर नीलेश चव्हाणच्या पोलिस कोठडीत वाढ झाली आहे. वैष्णवीचे बाळ चव्हाण याच्या ताब्यात असताना त्याने बाळाशी कोणत्या प्रकारची गैरवर्तन केली आहे का? याचा तपास करण्यात येत आहे. चव्हाण याचा या गुन्ह्याच्या कटामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

Related Articles