E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
सातबारा उतार्यावरील कालबाह्य नोंदी कमी होणार
Wrutuja pandharpure
13 May 2025
पुणे
: सातबारा उतार्यांवर अपाक शेरा, एकुमॅ नोंद, तगाई कर्ज, बंडींग कर्ज, भू-सुधार कर्ज इतर पोकळीस्त नोंदी अशा कालबाह्य नोंदी आहेत. या कालबाह्य नोंदीमुळे शेतकर्यांना जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार अथवा कर्ज प्रकरणे, भूसंपादन मोबदला आदी कामकाजावेळी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर सातबारा उतार्यावरील कालबाह्य व निरुपयोगी नोंदी कमी करण्याची मोहीम राबविण्याची सूचना महसूल विभागाने सर्व जिल्हाधिकार्यांना दिली आहे.सातबारा उतार्यावरील कालबाह्य आणि अनावश्यक नोंदी कमी होणार असल्याने सातबारा उतारा अधिक स्पष्ट अन् सुटसुटीत होणार आहे.
राज्यशासनाच्या महसूल विभागाने जिवंत सातबारा उतारा ही मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. आता मोहीमेच्या दुसर्या टप्प्यात सातबारा उतार्यावरील कालबाह्य नोंदी कमी करून सातबारा उतारा अद्ययावत करण्यात येणार आहे. सातबारा उतार्यावरील त्या-त्या काळात अनेक नोंदी करण्यात आल्या. आता कालानुरुप या नोंदी कमी करण्यासाठी तहसीलदार अथवा प्रांतधिकारी यांच्याकडे दाद मागावी लागते. या प्रक्रियेसाठी दोन ते सहा महिन्यांचा कालावधी लागतो. आता मात्र, सातबारा उतारे अद्ययावत करण्याच्या मोहीमेमुळे सातबारा उतार्यावरील कालबाह्य नोंदी कमी होणार आहेत. शासनाच्या या निर्णयाचा फायदा राज्यातील हजारो शेतकर्यांना होणार आहे. याबाबतच्या शासन निर्णय महसूल विभागाने कार्यरत अधिकारी प्रतापसिंह खरात यांनी जारी केला आहे. तसेच या संदर्भात महसूल अधिकारी व कर्मचारी यांना जिल्हाधिकार्यांनी प्रशिक्षण द्यावे व यामधील कालबाह्य नोंदी कमी करताना कायदेशीर बाबी समजून सांगाव्यात, असेही शासनाने म्हटले आहे.
ही कामे होणार
सातबारा उतार्यावरील अपाक शेरा कमी करणे, एकुमॅ (एकत्र कुटुंब मॅनेजर) तगाई कर्जाच्या नोंदी, नजर गहाण, सावकारी कर्ज, सावकारी अवार्ड, भूसंपादन निवाडा व बिनशेती आदेशानुसार प्रलंबित अंमल सातबारा उतार्यांवर घेणे नियंत्रित सत्ता प्रकार, शेरे प्रकार निहाय पडताळणी करून सातबारा उतार्यांवर अंमल घेणे, भोगवटादार वर्ग-१ व भोगवटादार वर्ग-२ असे स्वतंत्रपणे भूधारणा प्रकारनिहाय सातबारा उतारा तयार करणे, गावातील सार्वजनिक जागा जसे की स्मशानभूमी रस्ते, पाणीपुरवठा यांच्या नोंदी होणार.
Related
Articles
भारतीय महिलांच्या रिले संघाला रौप्यपदक
01 Jun 2025
दिल्लीतील उद्योग भवन बॉम्बने उडवण्याची धमकी
31 May 2025
वाचक लिहितात
06 Jun 2025
पावसामुळे टोमॅटो उत्पादकांना ५० कोटींचा फटका
03 Jun 2025
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोटार अपघात; तिघांचा मृत्यू
01 Jun 2025
भरधाव मोटारीने बारा जणांना उडवले
01 Jun 2025
भारतीय महिलांच्या रिले संघाला रौप्यपदक
01 Jun 2025
दिल्लीतील उद्योग भवन बॉम्बने उडवण्याची धमकी
31 May 2025
वाचक लिहितात
06 Jun 2025
पावसामुळे टोमॅटो उत्पादकांना ५० कोटींचा फटका
03 Jun 2025
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोटार अपघात; तिघांचा मृत्यू
01 Jun 2025
भरधाव मोटारीने बारा जणांना उडवले
01 Jun 2025
भारतीय महिलांच्या रिले संघाला रौप्यपदक
01 Jun 2025
दिल्लीतील उद्योग भवन बॉम्बने उडवण्याची धमकी
31 May 2025
वाचक लिहितात
06 Jun 2025
पावसामुळे टोमॅटो उत्पादकांना ५० कोटींचा फटका
03 Jun 2025
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोटार अपघात; तिघांचा मृत्यू
01 Jun 2025
भरधाव मोटारीने बारा जणांना उडवले
01 Jun 2025
भारतीय महिलांच्या रिले संघाला रौप्यपदक
01 Jun 2025
दिल्लीतील उद्योग भवन बॉम्बने उडवण्याची धमकी
31 May 2025
वाचक लिहितात
06 Jun 2025
पावसामुळे टोमॅटो उत्पादकांना ५० कोटींचा फटका
03 Jun 2025
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोटार अपघात; तिघांचा मृत्यू
01 Jun 2025
भरधाव मोटारीने बारा जणांना उडवले
01 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?