भारतीय ड्रोन हल्ल्यात सात ठार; सहा जखमी   

पाकिस्तानचा दावा

लाहोर : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गुजरात शहरात शनिवारी भारतीय ड्रोन हल्ल्यात आणि गोळीबारात सात जण ठार झाले. तर, सहा जण जखमी झाले, असा दावा पाकिस्तानी अधिकार्‍यांनी शनिवारी येथे केला. पंजाब प्रांतातील लाहोर, चिनियोट, पाकपट्टन, खारियन, शेखूपुरा आणि जलापूर जट्टन परिसराला भारतीय ड्रोनचा मोठा फटका बसला, असेही अधिकार्‍याने सांगितले.गेल्या शनिवारी सीमेवरील गावात भारतीय गोळीबार आणि ड्रोन हल्ल्यात सात जण ठार झाले. तर, सहा जण जखमी झाले, असेही ते म्हणाले.शनिवारी पहाटे भारताने डागलेल्या क्षेपणास्त्रांमुळे लाहोरपासून सुमारे ४०० किमी अंतरावर असलेल्या पंजाबमधील रहिम यार खान जिल्ह्यातील शेख झायेद आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (हवाई तळ) मोठे नुकसान झाले असल्याचेही अधिकार्‍याने सांगितले. 

Related Articles