E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
पाकिस्तानी क्रिकेटरचा मैदानातच मृत्यू
Wrutuja pandharpure
10 May 2025
कराची
: भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सध्या वाढला आहे. पहलगाम हल्ल्यातील पाकिस्तानचा कट उघडकीस आल्यानंतर, भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. या काळात, भारतीय सैन्यानं पाकिस्तानातील कोणत्याही सर्वसामान्य नागरिकांचं नुकसान होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली. पण, पाकिस्तानी सैन्य जम्मू आणि काश्मीरमधील पूंछमध्ये सतत गोळीबार करुन सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करत आहे. अशातच एक हादरवणारी बातमी समोर येत आहे. पाकिस्तान क्रिकेटवर शोककळा पसरली आहे. क्रिकेटचा सामना सुरू असतानाच २२ वर्षीय क्रिकेटपटू अलीम खानचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. २२ वर्षीय अलीम खान सध्या पाकिस्तानात सुरू असलेल्या पीसीबी चॅलेंज लीगमध्ये खेळत होता. ५ मे रोजी एका सामन्यादरम्यान, अलीम गोलंदाजी करताना अचानक जमिनीवर कोसळला. तो रन-अप घेत असताना हे घडले. अलीम अचानक कोसळल्यानंतर मैदानात उपस्थित अम्पायर्सनी तातडीनं मेडिकल टीमला मदतीसाठी बोलावलं. त्यानंतर अलीमला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, तोपर्यंत फार उशीर झालेला.
हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं गोलंदाज जमिनीवर कोसळला. त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, पण तरीसुद्धा तो वाचू शकला नाही. डॉक्टरांनी पुष्टी केली की, त्याच्या मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (पीसीबी) अलीमच्या मृत्यूनंतर तीव्र शोक व्यक्त केला. पाकिस्तानी क्रिकेट टीममधला धडाकेबाज गोलंदाज अलीम खान. अलिकडेच त्यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केलेली. तो खालच्या फळीतही चांगली गोलंदाजी करू शकत होता, त्यामुळे संघातील अकरा जणांमध्ये त्याचं असणं अत्यंत महत्त्वाचं होतं. जशी भारतात इंडियन प्रीमियर लीग खेळवली जाते, तशीच पाकिस्तानात पाकिस्तान सुपर लीगचं आयोजन केलं जातं. या सामन्यांचं प्रसारण भारतात केलं जात होतं. पण, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारतात या सामन्यांचं प्रसारण बंद करण्यात आलं. भारत सरकारनं भारतातील पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे अकाउंटवर बंदी घातली. भारतात पीएसएल आणि त्यांच्या संघांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरही बंदी घालण्यात आली आहे.भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीरिज आधीच थांबवण्यात आलेली. आता हल्ल्यानंतर बीसीसीआयनं आयसीसीकडे मागणी केली आहे की, आयसीसी स्पर्धांमध्ये एकाच ग्रुपमध्ये ठेवू नये. यामुळे दोन्ही संघ आमने-सामने येण्याची शक्यता आणखी कमी असेल.
Related
Articles
वकिलांनी बोलताना भान राखावे
31 May 2025
अंकिता भंडारीच्या खून प्रकरणी तिघांना जन्मठेप
01 Jun 2025
काश्मीरमध्ये तीन सरकारी कर्मचार्यांची हकालपट्टी
03 Jun 2025
मेधा पाटकर यांना ओडिशातील रायगडामध्ये जाण्यापासून रोखले
06 Jun 2025
न्यायमूर्ती चांदुरकर यांसह तीन न्यायाधीशांचा शपथविधी
31 May 2025
वीज कोसळण्यापूर्वी मिळणार अलर्ट

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर