E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
येमेनच्या क्षेपणास्त्रांमुळे इस्रायलमधील विमान सेवा बंद
Samruddhi Dhayagude
05 May 2025
तेल अवीव : इस्रायलमधील बेन गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळावर येमेनच्या इराण समर्थित बंडखोरांनी रविवारी क्षेपणास्त्र हल्ला केल्यानंतर विमानतळावरील उड्डाणे सुमारे एक तासासाठी विस्कळीत झाली.
येमेनच्या हुथी बंडखोरांनी डागलेल्या क्षेपणास्त्रामुळे या परिसरात धुराचे लोट पसरल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. गाझा युद्धा दरम्यान पॅलेस्टिनींशी एकता दर्शवण्यासाठी हुथी बंडखोर इस्रायलवर हल्ले करत आहेत. गाझा पट्टीमध्ये देशाच्या लष्करी कारवाया तीव्र करायच्या की, नाही यावर इस्रायलच्या कॅबिनेट मंत्र्यांनी घेतलेल्या मतदानाच्या आधी काही तास हा हल्ला झाला.
दरम्यान, गाझामध्ये पूर्ण प्रमाणात कारवाई होण्याची अपेक्षा असताना लष्कराने हजारो राखीव सैनिकांना बोलावण्यास सुरुवात केली आहे, असे अधिकार्यांनी सांगितले. रविवारी हुथी बंडखोरांनी डागलेल्या क्षेपणास्त्रानंतर इस्रायलच्या अनेक भागात हवाई हल्ल्याचे सायरन वाजले. इस्रायली माध्यमांनी प्रसारित केलेल्या छायाचित्रांनुसार, विमानतळावर धुराचे लोट पसरलेले दिसत होते. प्रवासी घाबरून आरडा-ओरडा करत पळत होते.
हल्ल्यानंतर हवाई, रस्ते आणि रेल्वे वाहतूक थांबवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. इस्रायल विमानतळ प्राधिकरणाने सांगितले, की सुमारे एक तासानंतर वाहतूक पुन्हा सुरू झाली. इस्रायलच्या पॅरामेडिक सेवेचे मॅगेन डेव्हिड अॅडोम यांनी सांगितले की, या हल्ल्यात चार जण किरकोळ जखमी झाले आहेत.
हायपरसोनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला
हुथी बंडखोरांचे लष्करी प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल याह्या सारी यांनी एका व्हिडिओ संदेशात जारी करत म्हटले आहे, की या विमानतळावर हायपरसोनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागण्यात आले आहे.
हल्ल्याला सातपटीने अधिक उत्तर देऊ
इस्रायलचे संरक्षण मंत्री काट्झ यांनी या विमानतळावरील हल्ल्याचा बदला घेतला जाईल असे स्पष्ट शद्बांत सांगितले आहे. ते म्हणाले, जो कोणी इस्रायलच्या नागरिकांना त्रास देईल आणि इस्रायलवर हल्ले करेल, त्याला आम्ही सोडणार नाही, त्याने केलेल्या हल्ल्याच्या सातपटीने अधिक त्याला उत्तर देऊ, असा इशारा काट्झ यांनी दिला आहे.
एअर इंडियाचे विमान अबू धाबीकडे वळवले
इस्रायल विमानतळावरील हल्ल्यामुळे रविवारी दिल्लीहून तेल अवीवला जाणारे एअर इंडियाचे विमान अबू धाबीला वळवण्यात आले. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा ही घटना घडली तेव्हा फ्लाइट क्रमांक एआय-१३९ बोईंग ७८७ हे विमान इस्रायलच्या बेन गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जात होते. ही घटना या विमानाच्या नियोजित लँडिंगच्या सुमारे एक तास आधी घडली. त्यामुळे हे विमान अबू धाबीला वळवण्यात आले. तेथून ते पुन्हा दिल्लीला परत येईल.
Related
Articles
झेलन्स्की यांचे जर्मनीत स्वागत
29 May 2025
अतिवृष्टीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची पदाधिकारी बैठक रद्द
29 May 2025
जालिंदर सुपेकर यांची तडकाफडकी बदली
31 May 2025
संभाजीनगरमध्ये संशयित दरोडेखोर चकमकीत ठार
28 May 2025
अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची तरुण पिढीला माहिती व्हावी
01 Jun 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठात करिअर मेळावा
03 Jun 2025
झेलन्स्की यांचे जर्मनीत स्वागत
29 May 2025
अतिवृष्टीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची पदाधिकारी बैठक रद्द
29 May 2025
जालिंदर सुपेकर यांची तडकाफडकी बदली
31 May 2025
संभाजीनगरमध्ये संशयित दरोडेखोर चकमकीत ठार
28 May 2025
अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची तरुण पिढीला माहिती व्हावी
01 Jun 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठात करिअर मेळावा
03 Jun 2025
झेलन्स्की यांचे जर्मनीत स्वागत
29 May 2025
अतिवृष्टीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची पदाधिकारी बैठक रद्द
29 May 2025
जालिंदर सुपेकर यांची तडकाफडकी बदली
31 May 2025
संभाजीनगरमध्ये संशयित दरोडेखोर चकमकीत ठार
28 May 2025
अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची तरुण पिढीला माहिती व्हावी
01 Jun 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठात करिअर मेळावा
03 Jun 2025
झेलन्स्की यांचे जर्मनीत स्वागत
29 May 2025
अतिवृष्टीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची पदाधिकारी बैठक रद्द
29 May 2025
जालिंदर सुपेकर यांची तडकाफडकी बदली
31 May 2025
संभाजीनगरमध्ये संशयित दरोडेखोर चकमकीत ठार
28 May 2025
अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची तरुण पिढीला माहिती व्हावी
01 Jun 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठात करिअर मेळावा
03 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात