रोहिंग्यांच्या बांगलादेश प्रवेशाला खालिदा झिया यांचा तीव्र विरोध   

ढाका : बांगलादेशात म्यानमारमधून येणार्‍या रोहिंग्यांना खुला प्रवेश देण्याचा निर्णय मोहमद युनूस यांच्या नेतृत्वाखालील हंगामी सरकारने घेतला आहे. त्या निर्णयाला बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाच्या (बीएनपी) नेत्या खालिदा झिया यांनी तीव्र विरोध केला आहे. रोहिंग्यांचा बांगलादेश प्रवेश असाच सुरू राहिला तर ही बाब देशाच्या भविष्यासाठी धोकादायक ठरणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
 
म्यानमार बौद्ध धर्मीय देश आहे. तेथे अल्पसंख्याक रोहिंग्या मुस्लिम धर्मीयांनी बहुसंख्य बौद्ध धर्मीयांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या धर्मगुरुंनी रोहिंंग्यांना पळवून लावा, अशी  मोहीम काही वर्षापूर्वी राबविली होती. त्यांच्या व्यापारावर बहिष्कार टाकला होता. त्यांच्या आर्थिैक नाड्या आवळल्या होत्या. त्यामुळे लाखोंच्या संख्येने रोहिंग्या मुस्लिम धर्मीय नागरिकांनी देश सोडून पलायन केले होते. अनेकांनी शेजारील देशांत आश्रय घेतला होता अनेकांनी जबरदस्तीने घुसखोरी देखील केली.
 
अनेकांनी बोटीतून पलायन केलेे. भारत, बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, थायलंडसह अन्य देशांत ते घुसले होते. बांगलादेशाने अनेकांना आश्रय दिला. आता तर युनूस सरकारने रोहिंग्ग्यांना देशात खुला प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला खालिदा झिया यांनी तीव्र विरोध केला. तसेच निर्णयावर चिंता व्यक्त केली आहे.
 

Related Articles