युद्धसराव जोरात   

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या तिन्ही संरक्षण दलांनी युद्ध सरावाद्वारे आपली ताकद दाखवण्यास सुरूवात केली आहे. दोन दिवसांपूर्वीच भारतीय नौदलाच्या जहाजांनी अरबी समुद्रात युद्धसराव केला होता. त्या अंतर्गत जहाजविरोधी अनेक क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेतली. त्यामध्ये घातक ब्रह्मोससह अन्य लघु, मध्यम आणि लांब पल्ल्यांच्या क्षेपणास्त्रांचा समावेश होता. 
 
भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती क्रॉप्सने एक्स या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये, भारतीय लष्कर सशस्त्र पोलिस दलांसोबत संयुक्त युद्ध अभ्यास सराव करत असल्याचे म्हटले आहे. आम्ही सर्व मोहिमांसाठी सज्ज आहोत, असे म्हणात सरावाची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. त्यामुळे लष्कर, हवाई दल आणि नौदलाकडून विविध ठिकाणी युद्धसराव सुरू आहे. दरम्यान, अरबी समुद्रात आंतरराष्ट्रीय समुद्र सीमेवर लढाऊ विमानवाहू आयएनएस विक्रांत, सुरतसह विविध युद्धनौकांचा ताफा सज्ज ठेवण्यात आला आहे. 
 

Related Articles