पंजाबमध्ये रेल्वेच्या घातपाताचा प्रयत्न   

रुळावर सापडले दगड आणि लोखंडी तुकडे

होशियारपूर : पंजाबमध्ये जालंधर ते जम्मू मार्गावर धावणार्‍या रेल्वेला घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न मंगळवारी फसला. जालंधरमधील  टांडा उरमार रेल्वेस्थानकाजवळ जम्मूकडे जाणार्‍या हेेमकुंत एक्स्प्रेसच्या मार्गावर दगड आणि लोखंडी तुकडे ठेवल्याचे उघड झाले. मंगळवारी  पहाटे एक्स्प्रेस रेल्वे स्थानकाजवळ आली. तेव्हा मार्गावर दगड आणि लोखंडी तुकडे ठेवल्याचे उघड झाले. चालकाने प्रसंगावधान राखून रेल्वे थांबविल्याने पुढील अनर्थ टळला. हेमकुंत एक्स्प्रेस हरिद्वारकडून जम्मूकडे जालंधर मार्गे जात होती. पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास चालकाने वेळीच रेल्वे थांबविल्यामुळे मोठा अपघात टळला आहे, अशी माहिती रेल्वे पोलिस आणि जालंधरचे पोलिस अधिकारी अशोक कुमार यांनी दिली.  

Related Articles