शेअर बाजारात उसळी कायम   

मुंबई : शेअर बाजारात मंगळवारी सेन्सेक्स आणि निफ्टी सलग दुसर्‍या दिवशी वाढले. दुसर्‍या सत्रात परदेशी संस्थात्मक संस्थांची गुंतवणूक वाढल्याचे दिसून आले. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचा परिणाम दिवसभरात दिसून आला. गुंतवणूकदार सावधपणे गुंतवणूक करत असल्याचे चित्र दिसले.
 
रिलायन्स इंडस्ट्रिजचे ब्लू चिप, इन्फोसिस आणि टाटा कन्सल्टन्सीचे समभाग खरेदीकडे कल अधिक होता. परदेशी आणि देशांतर्गत गुंतवणुकीचा ओघ निरंतर सुरू होता. सेन्सेक्स ७० ने वाढून दिवसअखेर ८० हजार २८८ वर बंद झाला. निफ्टी ७.४५ ने वाढून २४ हजार ३३५ वर बंद झाला.  रिलायन्स इंडस्ट्रिज, टेक महिंद्रा, इटर्नल, एचसीएल टेक, इन्फोसिस, इंडसइंड बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस आणि बजाज फिनसर्व्ह यांचे समभाग वाढले. या उलट अल्ट्रा टेक सिमेंट, सन फार्मा, ग्रिड पॉवर, एनटीपीसी, कोटक महिंद्रा बँक आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांचे समभाग घसरले. 

Related Articles