कर्नाटक हापूसचा हंगाम एक महिना उशीराने सुरू   

अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर आवक वाढली; दरही आवाक्यात

पुणे : कोकणातील हापूसचा हंगाम यंदा एक महिना आधी संपणार आहे. तर कर्नाटक हापूसचा हंगाम मात्र एक महिना उशीराने सुरू झाला आहे. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तांवर मार्केट यार्डात कर्नाटक हापूसची आवक वाढली आहे. बाजारात ३ हजार पेट्यांपर्यंत आवक पोहचली आहे. तर २ डझनाच्या २० हजार पेटींची आवक झाली. १ मे पासून आवक आणखी वाढणार आहे. १५ जूनपर्यंत या आंब्याचा हंगाम सुरू राहणार असल्याची माहिती मार्केट यार्डातील कर्नाटक हापूसचे व्यापारी रोहन उरसळ यांनी दिली. 
 
डिसेंबर, जानेवारी महिन्यात कर्नाटक हापूसच्या झाडांना चांगला मोहोर आला होता. मात्र, हवामान बदल्यामुळे हा मोहोर गळाला होता. त्यामुळे कर्नाटक हापूसचा हंगाम विलंबाने सुरू झाला आहे. एप्रिल महिन्यात या आंब्याची आवक अत्याल्प आहे. आता या आंब्याची आवक वाढत आहे. जरी आवक वाढली असली, तरीही ती नेहमीच्या तुलनेत निम्मीच आहे. मे महिन्यात हंगाम आणखी बहरणार आहे. आता होणार्‍या आवकपेक्षा दुप्पट, तिप्पट आवक होणार आहे. उष्णता अधिक असल्याने रत्नागिरीचा हंगाम मात्र १ महिना आधीच संपणार आहे.  दरम्यान कर्नाटकातून पायरी, लालबाग आणि बदामची आवक होत आहे. या मालालाही चांगली मागणी असल्याचे उरसळ यांनी नमूद केले.  
 
१० मे ला कोकणातील हापूसचा हंगाम संपणार आहे. त्यानंतर तुरळक आवक सुरू राहणार आहे. मात्र, या कालावधीत नागरिकांना कर्नाटक हापूसची चव चाखता येणार आहे. यावेळी कर्नाटक हापूसची आवक वाढणार आहे. आवक चांगली राहणार असल्याने दरही आवाक्यात असणार आहेत. त्यामुळे जूनपर्यंत ग्राहकांना कर्नाटक हासूची खरेदी करता येणार असल्याचेही रोहण उरसळ यांनी सांगितले.  

ग्राहकांकडून हापूसची खरेदी 

घाऊक बाजारात अक्षय्यतृतीयामुळे तयार मालाला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी वाढली होती. बाजारात एक डझनाचा दर ३०० ते ८०० रूपये होता. तयार मालाच्या ४ ते ८ डझनाच्या पेटीला १५०० ते ४००० दर मिळाला. ग्राहकांच्या संख्येत वाढ झाल्याने दुपारनंतर बाजारातील तयार माल संपला होता.आवक वाढली असल्याने दरात वाढ झाली नाही. बाजारात कोकणातून रोज ४ ते ५ हजार पेट्यांची आवक होत आहे. वाढलेल्या ऊन्हामुळष हापूस लवकर तयार होत आहे. 

- युवराज काची, हापूसचे व्यापारी मार्केटयार्ड. 

घाऊक बाजारातील कच्च्या मालाचे भाव 

डझन                     दर
३ ते ५ डझन            १००० ते १६००
२ डझन                  ३०० ते ५००
पायरी ४ डझन            १००० ते १५००  
लालबाग १ किलो        ४० ते ६०
बदाम एक किलो         ४० ते ५०

Related Articles