सोमनाथ सीमा भिंतीची उंची सहा फूट पुरेशी   

नवी दिल्ली : गुजरातमधील सोमनाथ मंदिराची सीमा भिंत बांधण्यात येणार आहे. भिंतीची उंची पाच ते सहा फूट पुरेशी आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सोमवारी सांगितले. 
सोमनाथ मंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी पहिले मानले जाते. या मंदिराजवळ अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे अपेक्षित उंचीची सीमा भिंत उभारण्यात अडथळे येत आहेत. ती बारा फूट उंचीची बांधण्याचा आग्रह धरला जात आहे. मात्र, ती उभारण्यापूर्वी तेवढ्या आकाराच्या पायासाठी अतिक्रमण हटवणे आवश्यक आहे. अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईच्या विरोधातील प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. त्या पार्श्वभूमीवर न्यायाधीश बी. आर. गवई आणि ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने सुनावणी दरम्यान, गुजरात सरकारला सांगितले की, सीमा भिंत पाच ते सहा फूट पुरेशी आहे. 

Related Articles