समाज माध्यमांवर प्रक्षोभक पोस्ट गायिका नेहा सिंह राठोडवर गुन्हा   

लखनौ : समाज माध्यमांवर प्रक्षोभक पोस्ट टाकणार्‍या लोकगायिका नेहा सिंह राठोडवर पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला.  पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ठराविक समुदायाला लक्ष्य करणारी पोस्ट टाकल्यामुळे त्यांच्या भावनांना ठेच पोहोचली आणि ती देशाच्या ऐक्याला तडा देणारी ठरली असल्याचे तिच्याविरोधात दाखल तक्रारीमध्ये नमूद केले आहे.
 
तक्रारदाराने म्हटले की, गेल्या आठवड्यात पहलगाममध्ये २६ नागरिकांच्या फाशीसारख्या हत्येचा संदर्भ दिला, ज्यात बहुतेक पर्यटक होते, दहशतवाद्यांनी धर्म आणि नाव विचारुन त्यांची हत्या केली. हत्याकांडामुळे संपूर्ण देश शोकाकुल झाला होता आणि गुन्हेगारांच्या रक्तासाठी आसुसला होता. असे असताना नेहा यांनी एक्सवर आक्षेपार्ह काही पोस्ट टाकल्या. त्या राष्ट्रीय ऐक्याला मारक आणि विशिष्ट धर्म समुदायाच्या भावनांना ठेच पोहोचविणार्‍या ठरल्या, अशी तक्रार अभय प्रताप सिंह यांनी केली आहे.दरम्यान, गुन्हा दाखल करुन सरकारने वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप नेहा यांनी केला. पहलगाम हल्ल्यानंतर सरकारने काय केले ? केवळ माझ्यावर गुन्हा दाखल केला एवढेच. माझ्यावर दोषारोप करण्यापूर्वी सरकारने दहशतवाद्यांचे डोके प्रथम कापून आणले पाहिजे. लोकशाही आहे. लोकशाही प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. जर मला तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार नसेल तर तुम्ही विरोधी पक्षात बसा, अशा आशयाची पोस्ट नेहाने सोमवारी टाकली होती. दरम्यान, लखनौतील हजरतगंज पोेलिस ठाण्यात तक्रार दाखल करुन घेतली होती. त्यानुसार पोलिसांनी नेहावर भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल केला. 
 

Related Articles