इराणकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध   

तेहरान : इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून केलेल्या संभाषणात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला.  दहशतवादाचा सामना करण्यासाठी प्रादेशिक सहकार्याच्या गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.दरम्यान, यूएस फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) संचालक काश पटेल यांनीही रविवारी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला, तसेच या लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.
 
अध्यक्ष पेझेश्कियान यांनी शनिवारी सांगितले, की इराण अशा अमानवीय कृत्यांचा स्पष्टपणे निषेध करतो. नवी दिल्लीतील इराणी दूतावासाने समाज माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.अशा दुःखद घटनांमुळे सर्व देशांची सामायिक जबाबदारी वाढते. या प्रदेशातील सर्व देशांनी चिरस्थायी शांतता आणि सौहार्द सुनिश्चित करण्यासाठी सहानुभूती, एकता आणि घनिष्ठ सहकार्याच्या माध्यमातून दहशतवादाची मुळे नष्ट करण्यासाठी कार्य करणे आवश्यक आहे. इराण भारत, महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांसारख्या प्रतिष्ठित व्यक्तींचा आदर करतो. जे शांतता, मैत्री आणि सहअस्तित्वाचे दूत होते. भारताच्या सर्व देशांसोबतच्या संबंधांमध्ये ही भावना कायम राहील, अशी आशा पेझेश्कियान यांनी व्यक्त केली. 
 
भारतीय-अमेरिकन काश पटेल यांनी रविवारी समाज माध्यमावर म्हणले, की एफबीआय काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील सर्व बळींप्रती शोक व्यक्त करतो, आणि भारताला पूर्ण पाठिंबा देतो.
 

Related Articles