झाडावर चढून पहलगाम हल्ल्याचे चित्रीकरण   

नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सुरू आहे. तपासाच्या दृष्टीने एनआयएला एक महत्त्वाचा पुरावा मिळाला आहे. दहशतवादी पर्यटकांवर गोळीबार करत असताना एका स्थानिक फोटोग्राफरने झाडावर चढून त्याचे चित्रीकरण केले आहे. हा फोटोग्राफर आता एनआयएसाठी महत्त्वाचा साक्षीदार म्हणून पुढे आला आहे. तसेच हल्ल्यावेळी दहशतवाद्यांकडे असलेली शस्त्रे पाकिस्तानमधील असल्याचे सांगण्यात येते.पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याच्या तपासाची जबाबदारी आता राष्ट्रीय तपास संस्थेकडे  देण्यात आली आहे. 

Related Articles