चार दिवसांत ५३७ जणांनी देश सोडला   

वाघा : पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी दिलेली मुदत रविवारी संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर अटारी वाघा सीमेवरुन अनेक जण मायदेशी परतत आहे.  गेल्या चार दिवसांत ५३७ नागरिकांनी देश सोडल्याची महिती देण्यात आली. १२ प्रकारच्या कमी वेळेच्या व्हिसावर ते देशात दाखल झाले होते. दरम्यान, पाकिस्तानातून ६२९ भारतीय परतले आहेत. त्यामध्ये १३ राजनैतिक आणि अधिकारी आहेत. पंजाबच्या अटारी वाघा सीमेवरून ते मायदेशात परतले. सार्क व्हिसासाठी २६ एप्रिल तर वैद्यकीय व्हिसाधारकांसाठी २९ एप्रिल अखेरची मुदत देश सोडण्यासाठी निर्धारित केली आहे. उद्योग, चित्रपट, पत्रकार, परिषदेत भाग घेणे, पर्वतारोहण, विद्यार्थी, पाहुणे, पर्यटकांचे समूह, भाविक आणि भाविकांचे गट अशा १२ प्रकारात पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा दिला गेला होता. 

Related Articles