मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडच्या पूर्णवेळ संचालकपदी अनंत अंबानी यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यकारी संचालकपदाची जबाबदारी त्यांना पुढील पाच वर्षांसाठी देण्यात आली असून १ मे पासून नियुक्ती लागू होईल. रिलायन्स इंडस्ट्रिजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी अनंत यांची नियुक्ती कार्यकारी संचालकपदी करत असल्याची घोषणा केली. या संदर्भात २५ एप्रिल रोजी संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. तत्पूर्वी समभागधारकांचा कलही जाणून घेतला होता.
Fans
Followers