जागतिक रंगभूमीचा प्रभावी वापर करा   

युवा रंगकर्मीना प्रसाद वनारसे यांचे आवाहन

पुणे : जागतिक रंगभूमी ही केवळ कला नसून समाजप्रेरक शक्ती आहे. भारताची समृद्ध संस्कृती जागतिक पातळीवर पोहचविण्याठी युवा रंगकर्मीनी जागतिक रंगभूमीचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन प्रसिद्ध नाटककार व दिग्दर्शक प्रसाद वनारसे यांनी केले. वेगवेगळ्या देशांनी आपापली संस्कृती जागतिक रंगभूमीवर पोहोचवली असताना, भारतीय संस्कृतीच्या प्रचारासाठी अधिक प्रयत्न करायला हवे, असेही यावेळी त्यांनी नमूद केले.
 
वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी ज्ञानसत्रात ‘जागतिक रंगभूमी आणि भारत’ या विषयावर प्रसाद वनारसे यांनी व्याख्यानमालेचे सहावे पुष्प गुंफले.प्रसाद वनारसे म्हणाले, भारतीय संस्कृती समृद्ध आहे. आपली नाट्य परंपरा,  विविधता, संतपरंपरा, संस्कृत रंगभूमी, प्रवचन, किर्तन, लोकपरंपरा, गोंधळ, संगीत नाटक, आंबेडकरी जलसे, शाहिरी अशी विविधतेने नटलेली समृद्ध रंगभूमीची देण आपल्याला लाभलेली आहे. आपल्या देशाची ही नाट्यपरंपरा, संस्कृती जगाच्या भाषेत सांगण्याची गरज आहे. जागतिकरणावर ही परंपरा पोहचविण्याठी कलाकारांनी मोठी चळवळ उभारण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
 
चीनने आपली संस्कृती जगभर पोहचविण्याठी रंगभूमीचा पूरेपुर वापर करीत आहे. त्या तुलनेत आपण मागे आहोत, अशी खंत यावेळी वनारसे यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, हिंदी चित्रपटसृष्टी आपली जगभर पोहचली. पण नाट्यपरंपरा पोहचविण्यात कमी पडलो असून ही परंपरा आणखी पुढे नेण्यासाठी प्रयत्न करायला हवे. ब्रिटीशांनी भारतात राजकीय वर्चस्व निर्माण करण्याबरोबरच आपल्या देशाची संस्कृतीचे बीजेदेखील पेरले होते. विविध देशाचे रंगभूमीची सुरुवात, रंगभूमीची माहिती उलगडली.
  
संतपरंपरा, संतकाव्य, कीर्तने, प्रवचन, संगीत नाटक, शाहिरी, जलसे अशी समृद्ध व वैभवशाली परंपरा आपल्याला लाभलेली आहे. महात्मा फुले यांनी  नाटकातून समाजप्रबोधन केले. विष्णुदास भावे, प्र. के. अत्रे, विजय तेंडूलकर यांची नाटके गाजलेली आहेत. ग्रीक नाटकांपासून ते आधुनिक सिनेमापर्यंत मानवाच्या सर्जनशीलतेचे आणि भावनांचे प्रतिबिंब दाखविले आहे. शेक्सपियर नाटककारांनी मानवीन जीवनाचे खोलवर चित्रण केले असल्याचे यावेळी वनारसे यांनी सांगितले.
 
जगभरातील नाटक क्षेत्रातील अनुभवाचा प्रवास यावेळी वनारसे यांनी उलगडला. लहाणपणापासूनच नाटकाचे बाळकडून मला घरातून मिळाले आहे. दक्षिण आफ्रिकेतील जागतिक रंगभूमी समजून घेता आले आहे. आपली भारतीय रंगभूमीत मोठी ताकत आहे. आपण आपली रंगभूमी जागतिकरणाकडे घेऊन जातोय का?  हा प्रश्न आपल्याला प्रत्येकाला पडायला हवा, असेही यावेळी त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन डॉ. अकल्पिता सप्रे यांनी केले.

Related Articles