E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
आयपीएलमध्ये लोकेश राहुलच्या ५ हजार धावा
Samruddhi Dhayagude
24 Apr 2025
नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या ४० वा सामना दिल्ली कॅपिटल्स संघाला एकहाती मॅच जिंकून देणार्या केएल राहुलसाठी खास ठरला. दिल्ली विरुद्ध लखनौ यांच्यातील लढत लोकेश राहुलसाठी आत्मसन्मानाची लढाई असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगल्याचे पाहायला मिळाले. गत हंगामात तो लखनौच्या संघाचे नेतृत्व करताना दिसला होता. यावेळी कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करत भर मैदानात संघ मालकाने केलेल्या अपमानाचा तो बदला घेणार का? अशी चर्चाही रंगल्याचे पाहायला मिळाले. लोकेश राहुलनं आपल्या बॅटिंगमधील क्लास दाखवत ही लढाई जिंकलीच. पण जुन्या संघाविरुद्ध दिमाखदार कामगिरी करताना त्याने नवा इतिहासही रचला.
आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलदगतीने ५ हजार धावा करण्याचा विक्रम आता लोकेश राहुलच्या नावे झाला आहे. लोकेश राहुल हा आयपीएलमध्ये पाच हजार धावा करणारा आठवा खेळाडू ठरलाय. याआधी विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, डेविड वॉर्नर, सुरेश रैना, एमएस धोनी आणि एबी डिविलियर्स यांनी हा पल्ला गाठला आहे.
लखनौच्या भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात लोकेश राहुलनं ऑस्ट्रेलियन स्टार क्रिकेटर डेविड वॉर्नरचा विक्रम मोडीत काढत आयपीएलमध्ये सर्वात जलद ५ हजार धावा करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला.
डेविड वॉर्नरनं २०२० च्या हंगामात सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना अबू धाबीच्या मैदानात रंगलेल्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात वॉर्नरनं १३५ डावात ५००० धावांचा पल्ला गाठला होता. केएल राहुलनं १३० डावात हा पल्ला गाठत आयपीएलमध्ये नवा इतिहास कायम केला आहे. आयपीएलमध्ये सर्वात जलदगतीने ५००० धावांचा टप्पा गाठणार्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली तिसर्या क्रमांकावर आहे. त्याने बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळताना १५७ डावात हा पल्ला गाठला होता. त्यापाठोपाठ या यादीत एबी डिविलियर्सचा नंबर लागतो. त्याने १५७ डावात ही कामगिरी करून दाखवली होती.
आयपीएलमध्ये सर्वात जलद ५००० धावा करणारे आघाडीचे ४ फलंदाज
केएल राहुल - १३० डाव (दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जाएंट्स, लखनऊ, एप्रिल २०२५)
डेविड वॉर्नर - १३५ डाव (सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, अबू धाबी, ऑक्टोबर २०२०)
विराट कोहली - १५७ डाव (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध मुंबई इंडियन्स, बंगळुरू, मार्च २०१९)
एबी डिविलियर्स - १६१ डाव
Related
Articles
‘श्याम’ची चटका लावणारी एक्झिट
11 May 2025
भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना निवृत्त
13 May 2025
रामजन्म आणि बाळ लीला
12 May 2025
लिंबाच्या दरात ५०० ते ६०० रूपयांनी घट
16 May 2025
वाचक लिहितात
16 May 2025
शिक्षण संस्थांचे प्रश्न सोडवण्यासाठी कृती दल स्थापन
15 May 2025
‘श्याम’ची चटका लावणारी एक्झिट
11 May 2025
भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना निवृत्त
13 May 2025
रामजन्म आणि बाळ लीला
12 May 2025
लिंबाच्या दरात ५०० ते ६०० रूपयांनी घट
16 May 2025
वाचक लिहितात
16 May 2025
शिक्षण संस्थांचे प्रश्न सोडवण्यासाठी कृती दल स्थापन
15 May 2025
‘श्याम’ची चटका लावणारी एक्झिट
11 May 2025
भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना निवृत्त
13 May 2025
रामजन्म आणि बाळ लीला
12 May 2025
लिंबाच्या दरात ५०० ते ६०० रूपयांनी घट
16 May 2025
वाचक लिहितात
16 May 2025
शिक्षण संस्थांचे प्रश्न सोडवण्यासाठी कृती दल स्थापन
15 May 2025
‘श्याम’ची चटका लावणारी एक्झिट
11 May 2025
भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना निवृत्त
13 May 2025
रामजन्म आणि बाळ लीला
12 May 2025
लिंबाच्या दरात ५०० ते ६०० रूपयांनी घट
16 May 2025
वाचक लिहितात
16 May 2025
शिक्षण संस्थांचे प्रश्न सोडवण्यासाठी कृती दल स्थापन
15 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
2
जातींची नोंद काय साधणार?
3
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
4
भारत-पाक तणाव निवळणार
5
भारताने ताकद दाखवली
6
व्यापार युद्धाचा चीनला फटका