बीडचे जिल्हाधिकारी पुन्हा बदलले   

अविनाश पाठक यांची बदली

विवेक जॉनसन नूतन जिल्हाधिकारी
 
मुंबई, (प्रतिनिधी) : कायदा आणि सुव्यस्था तसेच विविध गैरव्यवहारांच्या प्रकरणांमुळे चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यासाठी  राज्य सरकारने नवीन जिल्हाधिकारी दिले  आहेत. बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची बदली करून त्यांच्या जागी  चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  विवेक जॉनसन यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर पाठक यांची नियुक्ती मत्स्योद्योग महामंडळाचे व्यस्थापकीय संचालक म्हणून झाली  आहे.
 
राज्य सरकारने मंगळवारी पाच सनदी अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा यांची बदली संचालक, महापालिका प्रशासन मुंबई या पदावर झाली आहे.  विदर्भ वैधानिक मंडळाचे सदस्य सचिव शुभम गुप्ता यांची बदली  पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या व्यस्थापकीय संचालक म्हणून करण्यात आली आहे. तर,  अंबड (जि. जालना) उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंग यांची बदली चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी झाली आहे.

Related Articles