उत्तर प्रदेशात खांदेपालट ३३ प्रशासकीय अधिकार्‍यांच्या बदल्या   

लखनौ: उत्तर प्रदेशातील ३३ आयएएस अधिकार्‍यांच्या मंगळवारी बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये ११ जिल्हा न्यायदंडाधिकारी, तीन पोलिस अधिकारी यांचा समावेश आहे. 
माहिती संचालक शिशीर यांची बदली एएसएमईच्या विशेष सचिवपदी केली. वाराणसी विभागीय आयुक्त कौशल राज शर्मा याची नियुक्ती मुख्यमंत्र्यांच्या सचिवपदी केली. भदोईचे जिल्हा न्यायदंडाधिकारी विशाल सिंग आता माहिती आणि सांस्कृतिकचे संचालक असतील. वाराणसीचे जिल्हा न्यायदंडाधिकारी  एस. राजलिंगम यांच्याकडे विभागीय आयुक्तपद सोपविले आहे. या शिवाय हारपूर, आझमगढ, बरेली, आंबेडकरनगर, गाझीपूर, झांशी, महोबा, खुशीनकर, संत कबीर नगर आणि भदोईचे जिल्हा न्यायदंडाधिकारी यांच्या बदल्या केल्या आहेत. 

Related Articles