E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून भक्ती सागर, वाळवंट व पालखी तळांची पाहणी !
Samruddhi Dhayagude
07 Jun 2025
पंढरपूर, माळशिरस तालुक्यातील पालखीतळांची, रिंगण सोहळ्याच्या ठिकाणची केली पाहणी
सोलापूर : आषाढी यात्रेच्या अनुषंगाने यात्रा कालावधीत पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी पालखी तळांवर, भक्ती सागर (६५ एकर), चंद्रभागा वाळवंट येथे दिल्या जाणार्या सुविधांची पाहणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून करण्यात आली.यावेळी ६५ एकर (भक्ती सागर) येथे पाणी साठणार नाही, याची दक्षता घेऊन मुरमीकरण व रोलिंग करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक ती तांत्रिक मदत संबंधित यंत्रणेला करावी. तसेच या ठिकाणी वारकरी भाविकांना कायमस्वरूपी सुविधा देण्याबाबत नियोजन करावे करावे. स्वच्छता गृहाची तातडीने दुरुस्ती करून स्वच्छता करावी. चंद्रभागा नदी पात्राच्या बाजूला असलेली काटेरी झाडे झुडपे, मातीचे व दगडाचे ढिगारे तात्काळ काढावेत. नदीपात्रातील पाणी स्वच्छतेसाठी नगरपरिषदेकडून बसविण्यात आलेल्या 'सेबर टेक्नॉलॉजी मशीन'ला तातडीने वीज वितरण कंपनीने विद्युत पुरवठा करण्याचे निर्देश पालकमंत्री गोरे यांनी दिले.
पालकमंत्री गोरे यांनी वाखरी, बाजीराव विहीर, श्री संत सोपान काका,भंडीशेगाव, पिराची कुरोली, वेळापूर, माळशिरस, नातेपुते, धर्मपुरी येथील पालखी तळांची व रिंगण सोहळ्याच्या ठिकाणची पाहणी केली.यावेळी बाजीराव विहीर (वाखरी) येथे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराज पालखी सोहळ्याचे गोल रिंगण होते. हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी वारकरी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी उड्डाणपुलाच्या शेजारी असणारे लोखंडी बॅरिकेटिंग रिंगण सोहळा कालावधीत काढून घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. तसेच पालखीतळांवर पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधामध्ये पिण्याचे पाणी,शौचालय,स्नानगृह, महिला भाविकांची व्यवस्था आरोग्य सुविधा, सुरक्षा व्यवस्था आदी बाबतची माहिती तसेच सर्वच पालखी तळांवर मुरमीकरण करावे अशा सूचना दिल्या.
यावेळी त्यांच्या समवेत आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजीत पाटील, आमदार उत्तमराव जानकर, माजी आमदार राम सातपुते, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, विभागीय आयुक्त कार्यालयाचे अपर आयुक्त तुषार ठोंबरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी, प्रांताधिकारी सचिन इथापे, विजया पांगारकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले, कार्यकारी अभियंता अमित निमकर,तहसीलदार सचिन लंगुटे, सुरेश शेजुळ मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, मंदिर समितीची व्यवस्थापक मनोज श्रोत्री तसेच अन्य विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
Related
Articles
जपानला भारताने मागे टाकण्यावर शिक्कामोर्तब
12 Jun 2025
आषाढी वारी आणि एकादशीमुळे उपवासाच्या पदार्थांना मागणी
18 Jun 2025
पाकिस्तानी नागरिकावर ईडीचे आरोपपत्र
17 Jun 2025
माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताची तयारी सुरू
17 Jun 2025
१ जुलैपासून आधार जोडणीशिवाय तात्काळ तिकीट नाही
12 Jun 2025
मुंबई, कोकणात मुसळधार
17 Jun 2025
जपानला भारताने मागे टाकण्यावर शिक्कामोर्तब
12 Jun 2025
आषाढी वारी आणि एकादशीमुळे उपवासाच्या पदार्थांना मागणी
18 Jun 2025
पाकिस्तानी नागरिकावर ईडीचे आरोपपत्र
17 Jun 2025
माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताची तयारी सुरू
17 Jun 2025
१ जुलैपासून आधार जोडणीशिवाय तात्काळ तिकीट नाही
12 Jun 2025
मुंबई, कोकणात मुसळधार
17 Jun 2025
जपानला भारताने मागे टाकण्यावर शिक्कामोर्तब
12 Jun 2025
आषाढी वारी आणि एकादशीमुळे उपवासाच्या पदार्थांना मागणी
18 Jun 2025
पाकिस्तानी नागरिकावर ईडीचे आरोपपत्र
17 Jun 2025
माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताची तयारी सुरू
17 Jun 2025
१ जुलैपासून आधार जोडणीशिवाय तात्काळ तिकीट नाही
12 Jun 2025
मुंबई, कोकणात मुसळधार
17 Jun 2025
जपानला भारताने मागे टाकण्यावर शिक्कामोर्तब
12 Jun 2025
आषाढी वारी आणि एकादशीमुळे उपवासाच्या पदार्थांना मागणी
18 Jun 2025
पाकिस्तानी नागरिकावर ईडीचे आरोपपत्र
17 Jun 2025
माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताची तयारी सुरू
17 Jun 2025
१ जुलैपासून आधार जोडणीशिवाय तात्काळ तिकीट नाही
12 Jun 2025
मुंबई, कोकणात मुसळधार
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !