E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
भाजप पदाधिकारी ओंकार कदम आणि अक्षय कांबळे यांना पालिकेत प्रवेश बंदी
Wrutuja pandharpure
07 Jun 2025
महापालिका आयुक्तांचे आदेश
पुणे
: भाजपच्या पदाधिकार्याकडून महापालिकेच्या एका महिला वैद्यकीय अधिकार्याची गेल्या पाच महिन्यांपासून मानसिक त्रास देण्याचा प्रकारामुळे संबंधित महिला अधिकार्याने महिला आयोगाकडे तक्रारा केली. यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली असून महापालिकेने भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे पुणे शहराध्यक्ष ओंकार कदम आणि अक्षय कांबळे यांना महापालिकेत प्रवेश बंदी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आदेश दिले.
भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे पुणे शहराध्यक्ष ओंकार दिलीप कदम याच्यांकडून गेल्या पाच महिन्यांपासून पालिकेतील महिला वैद्यकीय अधिकार्याला त्रास देण्याचे काम सुरू आहे. वैद्यकीय अधिकारी यांच्या दालनात जमावाने जावून छायाचित्रीकरण करणे, कार्यालयाचा दरवाजा बंद करणे, धमकावणे असे प्रकार सुरू होते. याबाबत संबधित महिला अधिकार्याने महापालिका आयुक्त, आरोग्य विभाग प्रमुख यांच्याकडे तक्रार केली होती. त्याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यानंतर संबधित अधिकार्याने महापालिकेच्या अंतर्गत महिला तक्रार समितीकडे तक्रार केली होती.
महापालिकेत १७ फेब्रुवारी रोजी काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेतील महिला आरोग्य अधिकार्यावर, त्यांच्या कर्तव्य बजावणी दरम्यान पूर्व परवानगी न घेता महिला कर्मचारी यांचे चित्रीकरण करणे, दमदाटी करणे, अर्वाच्च भाषा वापरणे याशिवाय दालनाबाहेर जाण्यास मज्जाव करत त्यांचे कक्षात गोंधळ निर्माण करून जाणीवपूर्वक बदनामी करून त्यांना मानसिक त्रास दिला, अशी तक्रार कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) कायदा, २०१३ अन्वये प्राप्त झाली आहे. ही घटना अत्यंत गंभीर स्वरुपाची असून अंतर्गत तक्रार समितीकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली. समितीने दिलेल्या शिफारशीनुसार अशा दंडेलशाहीला आळा घालणे आवश्यक असल्याबाबत नमूद केले आहे. अशा प्रवृत्तीच्या लोकांमुळे प्रशासानाकडील अधिकारी, कर्मचारी यांचा वेळ वाया जाऊन नागरिकांना नागरी सेवा देण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
या बाबींचे गांभीर्य आणि तथ्य लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महापालिका मुख्यालय तसेच पालिकेच्या अन्य कार्यालयांमध्ये पुढील आदेश होईपर्यंत ओंकार कदम आणि अक्षय कांबळे यांच्यासह घटनेत सहभागी अनोळखी व्यक्तींना प्रवेश बंदी करण्यात येत आहे. कोणत्याही कारणांस्तव कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास, संबंधित सुरक्षा कर्मचार्यांनी त्वरित प्रतिबंध करून त्वरीत स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, असे परिपत्रक महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी काढले आहे.
Related
Articles
प्रणव घोलकर,नशा रेवसकर यांची विजेतेपदावर मोहोर
13 Jun 2025
खासदार बारणे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
15 Jun 2025
नाशिक शहर, पुणे ग्रामीण यांची मुलींमध्ये, तर उस्मानाबाद, परभणी यांची मुलांमध्ये उपउपांत्य फेरीत धडक
18 Jun 2025
नाल्यातून बैलगाडी नेताना शेतकर्यासह बैल बुडाला
18 Jun 2025
महाराष्ट्रात पावसाचे आठ बळी
16 Jun 2025
देशातील भीषण विमान अपघात

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !