E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
जमिनीच्या वादातून वकिलाने बंदूक दाखवली
Wrutuja pandharpure
07 Jun 2025
कासारसाईतील व्हिडीओ व्हायरल
पिंपरी
: जमिनीच्या वादातून एका वकिलाने बंदूक बाहेर काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वादातील जमीन पाहण्यासाठी आलेल्या वकिलाची जमीन मालकाने अडवणूक केल्यानंतर संबंधित वकिलाने चक्क बंदुकीचा धाक दाखवल्याचे या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. हिंजवडी जवळील कासारसाई येथे शुक्रवारी हा प्रकार घडला.
या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. बंदूक दाखवणार्या वकिलांचे नाव संदीप भोईर असे आहे. ते धनंजय वाडकर यांचे वकील आहेत.
कासारसाई येथील शब्बीर मुलानी आणि वाडकर यांच्यात जमिनीवरून गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरु आहे. मुलानी यांची काही जमीन वाडकरांनी खरेदी केली. मात्र ही जमीन कूळ कायद्यात मोडत असल्याने गेली १० ते १२ वर्षांपासून न्यायालयीन लढा सुरू आहे. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास वकील संदीप भोईर हे आपल्या साथीदारांसोबत कासारसाईत गेले. ते त्या वादातील जमिनीच्या ठिकाणी जात असताना मुलानी कुटुंबाने त्यांना अडवले.
त्यांच्यात वाद झाले. मुलानी कुटुंबाने वकीलांसह त्याच्यासोबत आलेल्या सर्वांना हुसकावल्यानंतर ते सर्वजण आपल्या गाड्यांकडे पळताना व्हायरल व्हिडिओत दिसून येत आहे. पळत असताना वकील भोईर यांनी कंबरेला अडकवलेले बंदूक बाहेर काढले. त्यामुळे मुलानी कुटुंब आक्रमक झाल्याचे व्हिडीओत दिसत आहे.वकील आणि त्यांच्या साथीदाराने तिथून पळ काढला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी दोन्ही बाजूच्या लोकांना पोलिसी ठाण्यात बोलावले होते.या घटनेने पुन्हा एकदा पिंपरी-चिंचवडमधील वाढती गुन्हेगारी, जमिनीच्या वादातून होणारे वाद यामुळे निर्माण झालेला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Related
Articles
नर्हेमध्ये खड्ड्यात गुलाब लावून प्रशासनाचा निषेध
18 Jun 2025
भारत लवकरच तिसरी आर्थिक महासत्ता
16 Jun 2025
विजय रुपाणींचा दुर्दैवी 'लकी नंबर' ; तोच अखेरचा दिवस ठरवला
13 Jun 2025
वाचक लिहितात
17 Jun 2025
श्री पोटोबा देवस्थानकडून वारकर्यांचा सन्मान
17 Jun 2025
१ जुलैपासून आधार जोडणीशिवाय तात्काळ तिकीट नाही
12 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !