E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पिंपरी-चिंचवडमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात
Wrutuja pandharpure
07 Jun 2025
भाजपतर्फे वृक्षारोपण आणि जनजागृती कार्यक्रम
पिंपरी
: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर पर्यावरण संवर्धनाच्या संदेशाने भारले होते. भारतीय जनता पक्षाच्यावतीने शहरभर विविध संस्था, राजकीय पक्ष आणि प्रशासकीय विभागांनी सहभागाने वृक्षारोपण व जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन केले. आमदार महेशदादा लांडगे आणि आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या नेतृत्वात झालेल्या या कार्यक्रमांमध्ये स्थानिक नेते, प्रशासकीय अधिकारी, नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.
पिंपळे सौदागर येथील शिव छत्रपती लिनिअर अर्बन गार्डन येथे ’शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन’ने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले. पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धनाचा संदेश देणारा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यांनी पर्यावरणाच्या संरक्षणाची गरज अधोरेखित केली आणि प्रत्येकाने वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. या प्रसंगी जयनाथ काटे, भरत काटे, प्रवीण कुंजीर, बाळकृष्ण परघळे, मनोज ब्राह्मणकर, दीपक गांगुर्डे यांच्यासह ’ऑल सिनियर सिटीजन असोसिएशन’चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.वनस्पती आणि पर्यावरणाच्या संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत, पिंपरी-चिंचवड येथे ’नक्षत्र बाग वृक्षारोपण सोहळा’ मोठ्या उत्साहात पार पडला. ’ट्रान्सपोर्टर्स असोसिएशन पुणे’ आणि ’विप्रा फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित हा कार्यक्रम गुरुवारी सूर्यमुखी हनुमान मंदिर, ट्रान्सपोर्ट नगर, हनुमान मंदिर निगडी येथे संपन्न झाला.
या सोहळ्याला आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, माजी महापौर राहुल जाधव, राजेंद्र बाबर, माजी उपमहापौर शैलजा मोरे, अजय पाताडे, तुषार हिंगे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, प्राधिकरण - चिंचवड मंडल अध्यक्ष जयदीप खापरे, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आनंदराव मुळुक, सुशांत मोहिते, संत ज्ञानेश्वर उद्यान हास्य परिवाराचे अध्यक्ष जगन्नाथ वैद्य, गणेश ढाकणे, नंदू कदम, बाळा शिंदे, प्रमोद भावसार, अनिल गौंड, आळंदी खंडोबा देवस्थानचे तानाजी काळभोर, सोमनाथ काळभोर, राधिका बोरालिकर, विजय शिनकर, देविदास साबळे, देविदास पाटील यांसह अनेक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी उपस्थिती लावली. मंडल अध्यक्ष जयदीप खापरे यांनी ’नक्षत्र बाग’ संकल्पनेचे महत्त्व विषद केले. या उपक्रमांतर्गत विविध प्रकारच्या देशी रोपांची लागवड करण्यात आली.
Related
Articles
प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीमध्ये घट
17 Jun 2025
लिप्यंतरामुळे मोडी लिपीच्या अभ्यासकांना प्रेरणा
14 Jun 2025
ज्योती मल्होत्राला जामीन नाकारला
12 Jun 2025
‘नीट’चा निकाल घसरला
15 Jun 2025
पूल धोकादायक होता तर प्रवेशबंदी का नाही?
17 Jun 2025
मंचर बाजार समितीमध्ये मेथीचे बाजारभाव कडाडले
13 Jun 2025
प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीमध्ये घट
17 Jun 2025
लिप्यंतरामुळे मोडी लिपीच्या अभ्यासकांना प्रेरणा
14 Jun 2025
ज्योती मल्होत्राला जामीन नाकारला
12 Jun 2025
‘नीट’चा निकाल घसरला
15 Jun 2025
पूल धोकादायक होता तर प्रवेशबंदी का नाही?
17 Jun 2025
मंचर बाजार समितीमध्ये मेथीचे बाजारभाव कडाडले
13 Jun 2025
प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीमध्ये घट
17 Jun 2025
लिप्यंतरामुळे मोडी लिपीच्या अभ्यासकांना प्रेरणा
14 Jun 2025
ज्योती मल्होत्राला जामीन नाकारला
12 Jun 2025
‘नीट’चा निकाल घसरला
15 Jun 2025
पूल धोकादायक होता तर प्रवेशबंदी का नाही?
17 Jun 2025
मंचर बाजार समितीमध्ये मेथीचे बाजारभाव कडाडले
13 Jun 2025
प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीमध्ये घट
17 Jun 2025
लिप्यंतरामुळे मोडी लिपीच्या अभ्यासकांना प्रेरणा
14 Jun 2025
ज्योती मल्होत्राला जामीन नाकारला
12 Jun 2025
‘नीट’चा निकाल घसरला
15 Jun 2025
पूल धोकादायक होता तर प्रवेशबंदी का नाही?
17 Jun 2025
मंचर बाजार समितीमध्ये मेथीचे बाजारभाव कडाडले
13 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !