E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पुण्यासह सर्व महापालिकांना विशेष तयारीचे आवाहन
Wrutuja pandharpure
03 Jun 2025
पुणे
: राज्यात कोरोनासह इन्फ्लूएंझा (एच १ एन १, एच ३ एन २) आणि श्वसनविकारजन्य आजारांची (आरएसव्ही) रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. सार्वजनिक व खासगी आरोग्य संस्थांनी तपासणी, विलगीकरण व उपचार व्यवस्था सज्ज ठेवावी, असा आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य सचिवांनी राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या आयुक्तांना सोमवारी दिला.
पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद यांसारख्या शहरी भागात संसर्गाच्या हंगामी चढउतार याची नोंद होत आहे. याबाबत आरोग्य विभागाचे आरोग्य आयुक्त निपुण विनायक व वीरेंद्र सिंह यांनी राज्यातील सर्व महापालिकांना खबरदारी घेण्याचा आदेश दिला आहे. त्यामध्ये म्हटले की, सध्या श्वसनविकाराचे प्रमाण वाढले असून यामध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन उपप्रकारातील ‘जेएन.१’ यासह ‘एक्सएफजी’ आणि ‘एलएफ७.९’ हे कोरोनाचे उपप्रकार अधिक संसर्गजन्य असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे ताप, खोकला, घसा खवखवणे यासारखे सौम्य आजार होत असून ते स्वतःहून कमी होतात, असे म्हटले आहे.सध्या देशात २८ मेपर्यंत १६२१ कोरोनाचे सक्रिय रुग्ण असून त्यापैकी ९० टक्के रुग्ण (केरळ, महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तमिळनाडू आणि कर्नाटक) या सहा राज्यांत आहेत.
अशी काळजी घ्या
जिल्हा, उपजिल्हा पातळीवरील तसेच वैद्यकीय महाविद्यालये, महानगरपालिका, नगरपरिषद रुग्णालये यांच्यामध्ये सेवा सुविधांचा आढावा घ्या.
ऑक्सिजन प्लांट्स, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड यंत्रणा पुन्हा तपासून सज्ज ठेवावी.
सर्दी, खोकला, ताप यांसारखी लक्षणे असलेल्या रुग्णांची सखोल तपासणी करावी.
नियमितपणे कोरोनाचे नमुने संकलन करून जनुकीय क्रमनिर्धारणासाठी ते पाठवावे.
जिल्हास्तरीय सर्वेक्षण युनिट मार्फत श्वसनविकार रुग्णांवर लक्ष ठेवण्यात यावे.
सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर, नियमित हात धुणे, गर्दीपासून सामाजिक अंतर राखा.
शाळा, महाविद्यालये, बस स्थानके, रेल्वे स्टेशन, मॉल्स या ठिकाणी स्वच्छता व तापमान तपासणी करा.
संसर्गाची लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करावी.
Related
Articles
विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दहा जणांचा मृत्यू
14 Jun 2025
सनदी लेखापाल हे भारतीय अर्थव्यवस्थेचे शिल्पकार : हणमंतराव गायकवाड
14 Jun 2025
‘शेतकर्यांनी शेतीकडे उद्योग म्हणून पहावे’
16 Jun 2025
कुकडी प्रकल्पात १०.६१ टक्केपाणीसाठा
18 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत हा धर्मग्रंथ राहिला सुखरूप
13 Jun 2025
बटाटा लागवडीकडे शेतकर्यांचा कल कमी
12 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !