E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
’एआय’च्या माध्यमातून चार दिवसात ३४७ जणांवर कारवाई
Wrutuja pandharpure
03 Jun 2025
पुणे
: फर्ग्युसन रस्त्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित प्रणालीद्वारे चार दिवसात ३४७ जणांवर कारवाई करण्यात आली. मात्र, फर्ग्युसन रस्त्यावरील बेशिस्त वाहतूक पाहता हे कारवाईचे प्रमाण तोकडे असल्याची टीका होत आहे. मात्र, एआय आधारित प्रणालीबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढल्यामुळे वाहतूक नियमांचे पालन करण्याकडे लोकांचा कल वाढत आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
फर्ग्युसन रस्त्यावरील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी एआय प्रणालीवर आधारित कॅमेर्यांद्वारे दंडात्मक कारवाई करण्याची योजना नुकतीच सुरू करण्यात आली. या योजनेचे उद्घाटन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते २८ मे रोजी करण्यात आले. तेव्हापासून शनिवारीपर्यंत ३४७ वाहनांवर कारवाई करण्यात आली.
एआय तंत्रज्ञानाद्वारे पहिल्या दिवशी १८० वाहनांवर कारवाई करण्यात आली. तर, दुसर्या दिवशी (२९ मे) ५० आणि तिसर्या दिवशी (३० मे) ५१ वाहनांवर कारवाई झाली. तसेच, चौथ्या दिवशी (३१ मे) दुपारी तीन वाजेपर्यंत ६६ वाहनांवर कारवाई करण्यात आली.फर्ग्युसन रस्त्यावर एआय आधारित प्रणाली बसविण्यात आली, तरीही बेशिस्त वाहतूक अद्यापही सुरूच असल्याचे दिसते. दुहेरी पार्किंग आणि विरुद्ध दिशेने येणार्या वाहनांच्या संख्येत काहीही घट झालेली नसल्याचे दिसून येते. तसेच, पदपथांवर मोठ्या प्रमाणावर वाहन पार्किंग केले जाते.
त्याकडे वाहतूक पोलिसांकडून कानाडोळा केला जात आहे. दोन दिवस एआय आधारित प्रणालीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी रस्त्यावर दोन वाहतूक पोलीस उभे करण्यात आले होते. मात्र, यापुढे रस्त्यावर वाहतूक पोलीस उभे असल्याचे दिसणार नाहीत. बेशिस्त वाहतुकीवर पूर्णपणे एआय आधारित प्रणालीद्वारे दंडात्मक कारवाई केली जाईल, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले.
Related
Articles
शरीरात सळ्या घुसल्याने ट्रेलर चालकाचा मृत्यू
13 Jun 2025
नोकर्यांच्या बाजारपेठेत वाढती लगबग
18 Jun 2025
अहमदनगर, मुंबई उपनगर पश्चिम,पुणे शहर संघांचे विजय
16 Jun 2025
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले
16 Jun 2025
प्रभाग रचनेच्या आदेशात वेळेची स्पष्टता नाही; मार्गदर्शन घेणार
12 Jun 2025
साखरपुड्याचे फोटो कुलदीपकडून डिलीट
17 Jun 2025
शरीरात सळ्या घुसल्याने ट्रेलर चालकाचा मृत्यू
13 Jun 2025
नोकर्यांच्या बाजारपेठेत वाढती लगबग
18 Jun 2025
अहमदनगर, मुंबई उपनगर पश्चिम,पुणे शहर संघांचे विजय
16 Jun 2025
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले
16 Jun 2025
प्रभाग रचनेच्या आदेशात वेळेची स्पष्टता नाही; मार्गदर्शन घेणार
12 Jun 2025
साखरपुड्याचे फोटो कुलदीपकडून डिलीट
17 Jun 2025
शरीरात सळ्या घुसल्याने ट्रेलर चालकाचा मृत्यू
13 Jun 2025
नोकर्यांच्या बाजारपेठेत वाढती लगबग
18 Jun 2025
अहमदनगर, मुंबई उपनगर पश्चिम,पुणे शहर संघांचे विजय
16 Jun 2025
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले
16 Jun 2025
प्रभाग रचनेच्या आदेशात वेळेची स्पष्टता नाही; मार्गदर्शन घेणार
12 Jun 2025
साखरपुड्याचे फोटो कुलदीपकडून डिलीट
17 Jun 2025
शरीरात सळ्या घुसल्याने ट्रेलर चालकाचा मृत्यू
13 Jun 2025
नोकर्यांच्या बाजारपेठेत वाढती लगबग
18 Jun 2025
अहमदनगर, मुंबई उपनगर पश्चिम,पुणे शहर संघांचे विजय
16 Jun 2025
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले
16 Jun 2025
प्रभाग रचनेच्या आदेशात वेळेची स्पष्टता नाही; मार्गदर्शन घेणार
12 Jun 2025
साखरपुड्याचे फोटो कुलदीपकडून डिलीट
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !