E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
एम एफ हुसेन यांच्या २५ चित्रांचा आता होणार लिलाव
Samruddhi Dhayagude
02 Jun 2025
मुंबई : 'पद्मश्री', 'पद्मभूषण' आणि 'पद्मविभूषण' सारखे पुरस्कार मिळालेले भारतातील सर्वात प्रसिद्ध चित्रकारांपैकी एक असलेल्या एम.एफ. हुसेन यांच्या २५ चित्रांचा लिलाव होणार आहे. ही चित्रे १७ वर्षांपासून बँकेच्या तिजोरीत धूळ खात होती. ही चित्रे १०० कोटी रुपयांच्या ऑर्डरशी, २३५ कोटी रुपयांच्या कर्ज गैरव्यवहाराशी आणि अगदी सीबीआय चौकशीशीही संबंधित आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार जेव्हा बँकेची तिजोरी उघडण्यात आली, तेव्हा एम.एफ. हुसेन यांच्या या चित्रांसह बऱ्याच कथाही बाहेर आल्या.
एम.एफ. हुसेन यांची ही २५ चित्रे गेल्या १७ वर्षांपासून मुंबईतील एका खासगी बँकेच्या तिजोरीत ठेवण्यात आली होती. आता १२ जून रोजी हॅमिल्टन हाउस येथे या चित्रांपैकी एक ‘M. F. Husain : An Artist’s Vision of XX Century’ या चित्राचा लिलाव होत आहे. हा लिलाव पांडोल आर्ट गॅलरीद्वारे केला जाईल.
१०० चित्रांच्या संग्रहाचा भाग
एम. एफ. हुसेन यांची ही २५ चित्रे त्यांच्या १०० चित्रांच्या संग्रहाचा भाग आहेत. एम. एफ. हुसेन यांनी ‘Our Planet Called Earth’ (OPEC) नावाच्या १०० चित्रांच्या मालिकेची योजना आखली होती. २००४ मध्ये त्यांनी यातील २५ चित्रे मुंबईतील कला संग्राहक स्वरूप श्रीवास्तव यांना विकली. ही चित्रे एम. एफ. हुसेन यांनी १०० कोटी रुपयांना दिलेल्या १०० चित्रांच्या ऑर्डरचा भाग होती. पण इथेच एक ट्विस्ट आला.
सीबीआयने २००६ मध्ये स्वरूप श्रीवास्तव यांच्याविरुद्ध २३५ कोटी रुपयांच्या कर्ज गैरव्यवहाराची चौकशी सुरू केली. हे कर्ज लोहखनिजाच्या आयातीसाठी घेण्यात आले होते, ज्यामध्ये १५० कोटी रुपयांच्या निधीचा गैरवापर करण्यात आला होता. यानंतर डिसेंबर २००८ मध्ये स्वरूप ग्रुपची १०४.२५ कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली. यामध्ये या २५ चित्रांचाही समावेश होता.
एम. एफ. हुसेन यांची ही चित्रे २००८ पासून बँकेच्या तिजोरीत पडून होती. स्वरूप श्रीवास्तव यांच्या प्रकरणात दीर्घ कायदेशीर प्रक्रियेनंतर हुसेन यांच्या या चित्रांना २ मे २०२४ रोजी न्याय मिळाला. स्वरूप श्रीवास्तव यांनी कर्जाचा काही भाग भरला, तरीही व्याज आणि उशिरा देयके इत्यादींसह उर्वरित रक्कम ५०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली.
जेव्हा प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात पोहोचली, तेव्हा न्यायालयाने पांडोल आर्ट गॅलरीला या २५ चित्रांचे मूल्यांकन करण्यास सांगितले. २ मे २०२४ रोजी, गॅलरीने न्यायालयाला सांगितले की, हुसेन यांच्या या चित्रांचे मूल्यांकन सुमारे २५ कोटी रुपये असू शकते. या वर्षी फेब्रुवारीमध्ये न्यायालयाने या चित्रांचा लिलाव करण्याचे आदेश दिले, ज्यासाठी १७ मे २०२५ रोजी स्वरूप ग्रुपने २५ कोटी रुपयांना खरेदी करण्याची ऑफर दिली.
परंतु कर्ज देणाऱ्या नाफेडने न्यायालयाला या चित्रांचा खुला लिलाव करण्याची विनंती केली, जेणेकरून त्यांना चांगली किंमत मिळेल. अशाप्रकारे, कोट्यवधी रुपयांच्या या चित्रांचा आता लिलाव होणार आहे.
Related
Articles
‘टॅरिफ वॉर’वर दुहेरी धोरणाचा उतारा
17 Jun 2025
ढासळते पर्यावरण रोखणे हे पुण्यापुढे मोठे आव्हान !
12 Jun 2025
शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणासाठी सरपंच व ग्रामपंचायतीने लक्ष घालावे : उपमुख्यमंत्री पवार
15 Jun 2025
भीमाशंकर परिसरात भात पेरणीची लगबग
13 Jun 2025
कुंडमळ्यातील शोधकार्य थांबविले
17 Jun 2025
अहिल्यानगरमध्ये वादळी वार्यासह जोरदार पाऊस
12 Jun 2025
‘टॅरिफ वॉर’वर दुहेरी धोरणाचा उतारा
17 Jun 2025
ढासळते पर्यावरण रोखणे हे पुण्यापुढे मोठे आव्हान !
12 Jun 2025
शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणासाठी सरपंच व ग्रामपंचायतीने लक्ष घालावे : उपमुख्यमंत्री पवार
15 Jun 2025
भीमाशंकर परिसरात भात पेरणीची लगबग
13 Jun 2025
कुंडमळ्यातील शोधकार्य थांबविले
17 Jun 2025
अहिल्यानगरमध्ये वादळी वार्यासह जोरदार पाऊस
12 Jun 2025
‘टॅरिफ वॉर’वर दुहेरी धोरणाचा उतारा
17 Jun 2025
ढासळते पर्यावरण रोखणे हे पुण्यापुढे मोठे आव्हान !
12 Jun 2025
शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणासाठी सरपंच व ग्रामपंचायतीने लक्ष घालावे : उपमुख्यमंत्री पवार
15 Jun 2025
भीमाशंकर परिसरात भात पेरणीची लगबग
13 Jun 2025
कुंडमळ्यातील शोधकार्य थांबविले
17 Jun 2025
अहिल्यानगरमध्ये वादळी वार्यासह जोरदार पाऊस
12 Jun 2025
‘टॅरिफ वॉर’वर दुहेरी धोरणाचा उतारा
17 Jun 2025
ढासळते पर्यावरण रोखणे हे पुण्यापुढे मोठे आव्हान !
12 Jun 2025
शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणासाठी सरपंच व ग्रामपंचायतीने लक्ष घालावे : उपमुख्यमंत्री पवार
15 Jun 2025
भीमाशंकर परिसरात भात पेरणीची लगबग
13 Jun 2025
कुंडमळ्यातील शोधकार्य थांबविले
17 Jun 2025
अहिल्यानगरमध्ये वादळी वार्यासह जोरदार पाऊस
12 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !