आमदाराच्या घरात शिरणार्‍यास अटक   

पुणे : खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणार्‍याला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. शंकर सर्जेराव धुमाळ (वय ४७) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. धुमाळ याने भीमराव तापकीर यांच्या धनकवडी परिसरातील घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी, आमदारांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेले सुरक्षा कर्मचारी अजित गणपत देवघरे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
 
आरोपी शंकर धुमाळ हा मागील अनेक दिवसांपासून वारंवार आमदार भीमराव तापकीर यांच्या घराजवळ जाऊन गोंधळ घालत होता. त्याने तीन वेळा आमदारांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. त्याला रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या आमदारांच्या सुरक्षेसाठी तैनात असणार्‍या पोलीस कर्मचार्‍याला त्याने शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली होती.

Related Articles